Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

टंचाई काळात उपसाबंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि.13: जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. पुढील काळात पाणी टंचाईचे संकट बिकट होऊ शकते. त्यामुळे ज्या ज्या विभागांना टंचाई निवरणार्थ उपायोजनांची जबाबदारी दिली आहे, अशा विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. टंचाईच्या ठिकाणी उपसा बंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी. उपसा बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. पाण्याचा अनधिकृत उपसा होऊ नये यासाठी भरारी पथके स्थापन करा, असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई निवरनार्थ उपाययोजनांची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, परिवीक्षाधिन आयएएस अधिकारी श्री. चंद्रा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, जलस्त्रोतांमधून अनधिकृतपणे आकडे टाकून पाणी उचलणाऱ्यांच्या विद्युत जोडण्यात खंडीत कराव्यात. वापण्यात येणारे उपसा पंप जप्त करावेत. सद्यस्थितीत पाणी पुरवठ्याचे व्यवस्थापन व्यवस्थीत झाले नाही तर टंचाई काळात फार मोठ्या संकटाला सामोरे जावू लागते याचे भान ठेवून यंत्रणेने काम करावे. गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावर समिती स्थापन करुन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून या विषयाचा नियमित आढावा घ्यावा.

टंचाईस्थितीत करण्यात येत असणाऱ्या आराखड्यांचा तालुका निहाय आढावा घेऊन जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, ज्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे अशा सर्वं टँकरर्सचे जीपीएस प्रणालीद्वारे नियंत्रण करण्यात यावे. टँकरचा वापर पूर्ण क्षमतेने होईल याची दक्षता घ्यावी. अटल भूजल योजना, जलयुक्त शिवार, जलजीवन मिशन, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, रोजगार हमी या सारख्या योजनांमधून जल स्त्रोत बळकीटकरण करण्याची कामे प्राधान्याने करावीत. यासाठी तहसीलदारांनी कामांचे आराखडे तयार करावेत. 

रोजगार हमी योजनेतील कामांचा आढावा घेत असताना जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, टंचाई काळात लोकांना कामाची गरज पडू शकते अशा वेळी नरेगामधून बांबु लागवड आणि जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर घेण्यात यावी. जलजीवन मिशन कामांचा आढावा घेताना ते म्हणाले, ज्या कामांच्या प्रशासकीय मान्यता झाल्या नाहीत त्या 7 दिवसाच्या आत पूर्ण कराव्यात. जलयुक्त शिवार मधील 3 हजार कामे मे 2024 पर्यंत पूर्ण करावीत. जिल्ह्यातील जलस्त्रोत बळकटीकरणासाठी व गाळमुक्तीसाठी टाटा कंपनी सीएसआर फंडातून मदत करणार असल्याचे सांगून श्री.डुडी यांनी प्रत्येक तालुका निहाय या कामासाठी स्वयंसेवी संस्था नियुक्त केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जलस्त्रोत बळकटीकरणासाठी आवश्यक गाळमुक्तीची सर्व कामे तातडीने सुरु करण्यात यावीत. या कामांना निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही देवून ज्या ठिकाणी चारा छावणीची आवश्यकता आहे. अशा ठिकाणी चारा छावणी व चारा उपलब्धतेसाठी आवश्यक ते सर्व नियोजन करावे.जिल्हयामध्ये ओल्या चा-याची आणि सुक्या चा-याची आवश्यकता आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे चारा उपलब्धतेचे नियोजन करा. अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. या बैठकीला सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER