Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
शेतकरी पाणी - चाऱ्यासाठी हवालदिल, नेते मात्र लावणीच्या तालावर दंग सांगलीतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत फलटण वकील संघाची चमकदार कामगिरी; सातारा जिल्हा गुणतालिकेत प्रथम आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न

शेतकरी पाणी - चाऱ्यासाठी हवालदिल, नेते मात्र लावणीच्या तालावर दंग

टीम : धैर्य टाईम्स

फलटण : सचिन मोरे 


एकीकडे फलटण तालुक्यात दुष्काळाचे सावट गडद होत असताना, काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या संकटावर मात करण्यासाठी ठोस उपाययोजनांची चर्चा व्हायला हवी होती; मात्र फलटणमध्ये फेस्टिव्हल आणि लावणी महोत्सवाच्या आयोजनाची जाहिरात झळकत असल्याने संतप्त सवाल उपस्थित होत आहेत.


शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी, जनावरांसमोर चारा नाही; मग जल्लोषाचा हा कोणता काळ?


फलटण तालुक्यातील शेतकरी आज पावसाच्या अनिश्चिततेने आणि पाणीटंचाईच्या चिंतेने त्रस्त आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वेळ येत असेल, तर उन्हाळ्यात जनावरांना पाणी कुठून द्यायचे, चारा कुठून आणायचा आणि शेतीचा खर्च कसा भागवायचा, हे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. अशा वेळी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी किती नियोजन सुरू आहे, याची चर्चा होण्याऐवजी फेस्टिव्हलच्या कार्यक्रमांचा गाजावाजा होत असल्याने नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.


लावणीच्या तालावर ठेका धरण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांच्या वेदना समजून घेण्याची गरज!


२४ ऑक्टोबर पासून फलटण मध्ये फेस्टिव्हल महोत्सवा मध्ये.सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य महोत्सव आणि लावणी महोत्सवाचे आयोजन जाहीर करण्यात आले आहे. मनोरंजनाच्या कार्यक्रमांना विरोध असण्याचे कारण नाही; पण तालुक्यातील ग्रामीण भाग पाणीटंचाईशी झुंजत असताना अशा आयोजनांच्या वेळेवर आणि सामाजिक प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 


नेत्यांनी आणि आयोजकांनी एकदा ग्रामीण भागात जाऊन पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या अडचणी समजून घ्याव्यात. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? जनावरांसाठी चारा उपलब्धतेचे काय नियोजन आहे? टँकरवर अवलंबून असलेल्या गावांसाठी पुढील उन्हाळ्याची तयारी काय आहे? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळायला नकोत का?


फेस्टिव्हलचा झगमगाट दिसतोय; मग दुष्काळग्रस्तांसाठीच्या उपाययोजना कुठे आहेत?


फेस्टिव्हलच्या जाहिराती, कार्यक्रमांची रूपरेषा आणि मनोरंजनाच्या तयारीचा तपशील जनतेसमोर येत आहे. मग दुष्काळग्रस्त गावांसाठीच्या नियोजनाची माहितीही त्याच स्पष्टतेने जनतेसमोर का येऊ नये? उत्सवासाठी पुढाकार घेणाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांवरही तितक्याच तत्परतेने पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा चुकीची कशी ठरू शकते?


जनतेला मनोरंजन नको, असा प्रश्न नाही; जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होऊ नये, हा खरा मुद्दा आहे. शेतकऱ्यांचे जगणेच पाण्यावर अवलंबून असताना त्यांच्या संकटाची तीव्रता लक्षात न घेता केवळ उत्सवी वातावरणाची जाहिरात केली जात असेल, तर त्या प्राधान्यक्रमावर प्रश्न विचारले जाणारच.


फलटणकरांचा सवाल एकच — आधी तहानलेल्या गावांची चिंता की फेस्टिव्हलचा जल्लोष?


दुष्काळ ही केवळ पाण्याची समस्या नाही; ती शेतकऱ्यांच्या उपजीविकेची, जनावरांच्या अस्तित्वाची आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची समस्या आहे. त्यामुळे संबंधित नेते आणि आयोजकांनी दुष्काळग्रस्तांसाठी केलेल्या उपाययोजनांचा तपशील जनतेसमोर मांडावा. फेस्टिव्हलच्या झगमगाटासोबत सामाजिक जबाबदारीची जाणीवही कृतीतून दिसली पाहिजे अशी आता तालुक्यात चर्चा होऊ लागली आहे.


ऐन दुष्काळात लावणीचा जल्लोष सुरू असताना, फलटणच्या तहानलेल्या गावांचा आवाज कोण ऐकणार? हा प्रश्न आता केवळ शेतकऱ्यांचाच नाही, तर संपूर्ण तालुक्याच्या प्राधान्यक्रमाचा झाला आहे.


ज्या संस्था ऐन दुष्काळात लावणीवर पैसे उधळणार आहेत. त्यांनी सामाजिक जाणीव ठेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना, जनावरांना कोणता सामाजिक हातभार लावला हा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER