Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न आपली फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी लोकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची : रणजितसिंह नाईक निंबाळकर शेतकरी-जनावरांचा पाण्यासाठी टाहो, नेत्यांना पाहिजे घुंगरांचा खणखणाट! शेतकरी पाणी - चाऱ्यासाठी हवालदिल, नेते मात्र लावणीच्या तालावर दंग सांगलीतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत फलटण वकील संघाची चमकदार कामगिरी; सातारा जिल्हा गुणतालिकेत प्रथम आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील

५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न

कोळकी येथील बुद्धविहारात मंगलमय वातावरणात कार्यक्रम; तालुका शाखेच्या कार्याचे मान्यवरांकडून कौतुक
टीम : धैर्य टाईम्स

फलटण : भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेचा सांगता समारोह रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कोळकी येथील बुद्धविहारात मंगलमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. तालुका शाखेने वर्षावास काळात ५६ गावांमध्ये ३२ विषयांवर प्रवचनांचे नियोजन करून ही मालिका यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी शाखेच्या कार्याचे कौतुक केले.


कार्यक्रमानिमित्त कोळकी बुद्धविहार परिसर आकर्षक रांगोळीने सजविण्यात आला होता. सकाळी १० वाजता उपासक, उपासिका आणि समता सैनिकांच्या उपस्थितीत पंचरंगी धम्मध्वजाला सलामी देऊन ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सामूहिक त्रिसरण, पंचशील, बुद्धपूजा, भीमस्तुती, भीमस्मरण आणि स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


तालुका अध्यक्ष भीमराव लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष नानासो मोहिते यांच्यासह जिल्हा व तालुका शाखेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. वर्षावास काळातील उपक्रमांचा आढावा घेताना राजकुमार रणवरे यांनी ५६ गावांमध्ये ३२ विषयांवर प्रवचनांचे नियोजन, प्रवचनकारांची निवड आणि संपूर्ण मालिकेच्या यशस्वी अंमलबजावणीची माहिती दिली.


माजी प्राचार्य सावंत सर यांनी यंदाच्या वर्षावास काळात आतापर्यंतच्या वर्षावासांच्या तुलनेत सर्वाधिक प्रवचने झाल्याचे सांगून नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. अरुण गायकवाड यांनी सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन केलेल्या कार्याचे कौतुक केले. महिला जिल्हाध्यक्ष सुजाता गायकवाड आणि महिला तालुकाध्यक्षा रंजना मॅडम यांनीही तालुका कार्यकारिणीच्या कामगिरीचे अभिनंदन केले.


माजी जिल्हाध्यक्ष श्रीमंत घोरपडे सर यांनी ग्रामशाखांच्या नियोजनासह आगामी काळातील कार्याची दिशा स्पष्ट केली. संस्कार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सोमिनाथ घोरपडे यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणाऱ्या भावना व्यक्त केल्या. जिल्हाध्यक्ष नानासो मोहिते यांनी वर्षावास काळात घेण्यात आलेल्या परिश्रमांचा आढावा घेतला. तसेच ‘मिशन २५’ अंतर्गत निश्चित केलेले उद्दिष्ट तालुका शाखा लवकरच पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला.


अध्यक्षीय भाषणात तालुकाध्यक्ष भीमराव लोंढे यांनी तालुका शाखेच्या सर्व सदस्यांच्या योगदानामुळे ५६ गावांमध्ये प्रवचन मालिका आणि ग्रामशाखांच्या माध्यमातून यशस्वी काम करता आल्याचे सांगितले. केशव ठोंबरे, राजकुमार रणवरे, अरविंद निकाळजे, श्रीनिवास धाईंजे, प्रदीप जगताप, चंद्रकांत मोहिते, भिकू भोसले, अर्जुन ननावरे, प्रभुदास मेश्राम, विजय लोंढे, शं. ज्ञा. कांबळे, राजेंद्र अहिवळे, सुनील मोहिते, सुनील कांबळे, धीरज मोरे, अनिकेत कांबळे, संपत माने, राजेंद्र गायकवाड, संजय भोसले, सचिन मोहिते, सचिन रोकडे तसेच माजी संघटक आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी विशेष कौतुक केले.


आगामी काळात संस्थेची सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमानंतर अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. सचिन मोहिते यांनी आभार मानले, तर सरचिटणीस केशव ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. सामूहिक सरणतयाने कार्यक्रमाची सांगता झाली.


यावेळी शरद मोरे (पिंपरद), यशवंत काकडे (झिरपवाडी) आणि अविनाश जगताप यांच्यासह विविध ग्रामशाखांच्या सदस्यांनी मनोगते व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.


एकूणच, ५६ गावांमध्ये राबविण्यात आलेली वर्षावास प्रवचन मालिका आणि सांगता समारोहाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला आणि आगामी उपक्रमांसाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळाले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER