फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र व दसरा महोत्सवानिमित्त आज बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक ७.३० वाजता श्री माळजाई देवीची महाआरती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. अशी माहिती माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने प्रमोद निंबाळकर यांनी दिली.
या महाआरतीस फलटणमधील भाविक पत्रकार लायन्स क्लब परिवारातील सर्व सन्माननीय सदस्यांचीनी उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवाच्या या मंगलमय पर्वात श्री. माळजाई देवीच्या दर्शनाचा, व महाआरतीचा लाभ फलटण शहरासह परिसरातील सर्व भाविकांनीं यासाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन लायन्स क्लब फलटण आणि माळजाई मंदिर उद्यान समिती यांच्या तर्फे करण्यात येत आहे.















