फलटण प्रतिनिधी :
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर निसर्ग ग्रुपतर्फे फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथे ‘निसर्ग पार्क’ या नवीन गृहप्रकल्पाची सुरु झाला आहे. या प्रकल्पांतर्गत २ बीएचकेचे एकूण ६० बंगले उभारण्यात येणार असून, ग्राहकांसाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे.
या गृहप्रकल्पामध्ये आधुनिक सुविधांसह बंगल्यांची उभारणी करण्यात येणार आहे. प्रकल्पाची रचना वास्तुशास्त्रानुसार करण्यात आली असून, अंतर्गत रस्ते ३० व २० फुटांचे असणार आहेत.
प्रकल्पातील प्रस्तावित सुविधांमध्ये २४ तास मुबलक पाणीपुरवठा, पार्किंगमध्ये पेव्हर्स ब्लॉक, प्रत्येक बंगल्यासाठी स्वतंत्र पार्किंग, चार फुटांपर्यंत किचन टाइल्स, किचनमध्ये एक लिफ्ट, बेडरूम व हॉलमध्ये पीओपी, सात फुटांपर्यंत बाथरूम टाइल्स, टॉयलेटमध्ये चार फुटांपर्यंत टाइल्स, आतून व बाहेरून ऑइल बॉण्ड कलर, दरवाजांना कोटिंगमध्ये मेन चौकट लाकडी, लाईट कन्सील्ड, आय.एस.आय. मार्क वायरिंग व स्विच तसेच संपूर्ण प्रकल्पाला कंपाउंड अशा सुविधांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

















