बस स्टॉपवर जॅकी श्रॉफ बसलेले होते. तेवढ्यात एका जाहिरात एजन्सीचा माणूस त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, मॉडेलिंग कराल का.? जॅकी श्रॉफ म्हणाले, हे काय असतं.?
त्या माणसाने सांगितलं, तुमचा फोटो काढतील आणि त्याबदल्यात तुम्हाला पैसे मिळतील. जॅकी श्रॉफ कॅमेऱ्यासमोर उभे राहिले. त्यांना त्यांच्या पहिल्या LD Obron जाहिरातीसाठी त्यावेळी ७,५०० रुपये मिळाले. अभिनयाच्या वर्गात त्यांची ओळख देवानंद यांचा मुलगा सुनील आनंद याच्याशी झाली. जाहिरातीमध्ये जॅकी श्रॉफ यांचा फोटो पाहून देवानंद यांनी त्यांना स्वामी दादा या चित्रपटात शक्ती कपूरच्या मागे उभ्या असलेल्या गुंडाची भूमिका दिली. स्वामी दादा चित्रपटातील एक दृश्य पाहून सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ यांना आपल्या आगामी हिरो या चित्रपटासाठी बोलावले.
सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ यांना विचारले, अभिनय करता येतो का..?
जॅकी श्रॉफ म्हणाले, सर, नाही येत.
डान्स करता येतो का.?
जॅकी श्रॉफ म्हणाले, सर, नाही येत.
गाणं म्हणता येतं का.?
जॅकी श्रॉफ म्हणाले, सर, नाही येत.
तेव्हा सुभाष घई म्हणाले, तुम्हीच माझ्या 'हिरो' चित्रपटाचे हिरो आहात..!
यालाच म्हणतात नशीब..!
हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही. प्रतिभा प्रत्येकामध्ये असते; पण नशीब घेऊन प्रत्येकजण जन्माला येत नाही. एखाद्याच्या यशामध्ये प्रतिभा आणि नशीब या दोन्हींची भूमिका महत्वाची असते.
साभार - फेसबुक

















