Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सौ. प्रिया अमोल नाळे-बोराटे यांची राज्य स्तरावर आयडॉल शिक्षक म्हणून निवड फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडीचे आवर्तन किमान ४५ दिवस सोडावे; पाणीपट्टी माफ करण्याची आमदार सचिन पाटील यांची मागणी दादांना मानलं पाहिजे! विरोधकांकडूनही रणजितदादांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे कौतुक; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दाखवली ताकद! सोसायटी मतदारसंघात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा अवघ्या 11 मतांनी पराभव; विजयापेक्षा संघर्षाचीच तालुक्यात चर्चा प्रत्येकाचे नशीब जॅकी श्रॉफ सारखे नसते एखादाच असतो ज्याला अशी संधी मिळते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी फलटणमध्ये कलम १६३ लागू; मतदान केंद्र परिसरात कडक निर्बंध - कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव श्री दत्त इंडिया साखर कारखान्याकडून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या बिलापोटी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे रक्कम वर्ग - मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांची माहिती ५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न आपली फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी लोकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची : रणजितसिंह नाईक निंबाळकर शेतकरी-जनावरांचा पाण्यासाठी टाहो, नेत्यांना पाहिजे घुंगरांचा खणखणाट! शेतकरी पाणी - चाऱ्यासाठी हवालदिल, नेते मात्र लावणीच्या तालावर दंग सांगलीतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत फलटण वकील संघाची चमकदार कामगिरी; सातारा जिल्हा गुणतालिकेत प्रथम आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडीचे आवर्तन किमान ४५ दिवस सोडावे; पाणीपट्टी माफ करण्याची आमदार सचिन पाटील यांची मागणी

टीम : धैर्य टाईम्स
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत फलटण तालुक्यातील पाणीप्रश्नांवर आमदार सचिन पाटील यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष; कालवा गळती दुरुस्ती आणि वासना-वंगना उपसा सिंचन योजनेचे वीजबिल टंचाई निधीतून भरण्याचीही मागणी

फलटण प्रतिनिधी :

सातारा येथील नियोजन भवनात धोम-बलकवडी, धोम, कण्हेर, उरमोडी व तारळी प्रकल्पांच्या रबी हंगामातील कालवा सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडी प्रकल्पातून पाणी आवर्तन सोडण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार सचिन पाटील यांनी फलटण तालुक्यातील शेतकरी, पाणी व्यवस्थापन आणि सिंचनाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले.


फलटण तालुक्यातील लाभक्षेत्रात आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेऊन योग्य नियोजन करावे, अशी आग्रही मागणी आमदार सचिन पाटील यांनी बैठकीत केली. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून लाभक्षेत्रातील सर्व गावांना आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध होईल, याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडी प्रकल्पाचे पाणी आवर्तन किमान ४५ दिवसांसाठी सोडण्यात यावे, अशी ठाम मागणी केली. तालुक्यातील शेती मोठ्या प्रमाणावर सिंचनाच्या पाण्यावर अवलंबून असून, पाण्याचे आवर्तन कमी कालावधीसाठी मिळाल्यास शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे लाभक्षेत्रातील गावांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी किमान ४५ दिवसांचे आवर्तन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.


तसेच फलटण तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना पाणीपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. नैसर्गिक परिस्थितीमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना पाणीपट्टीच्या भारातून दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


कालव्यांमधून होणारी पाण्याची नासाडी रोखण्याच्या दृष्टीने कालव्यांच्या दरवाजांमधील गळती तातडीने दुरुस्त करण्यात यावी, अशी सूचनाही आमदार पाटील यांनी केली. कालव्यांच्या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने उपलब्ध पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन पाण्याची बचत करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.


याशिवाय मतदारसंघातील उत्तर कोरेगाव भागातील वासना-वंगना उपसा सिंचन योजनेच्या वीजबिलाचा प्रश्नही त्यांनी बैठकीत उपस्थित केला. सदर योजनेचे वीजबिल टंचाई निधीतून भरण्यात यावे, जेणेकरून योजनेवरील आर्थिक भार कमी होऊन नागरिकांना पिण्याचे पाणी व शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिलासा मिळेल, अशी मागणी त्यांनी केली.


फलटण तालुक्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पाण्याचे योग्य नियोजन, पुरेशा कालावधीचे आवर्तन, पाणीपट्टी माफी, कालव्यांची गळती दुरुस्ती आणि उपसा सिंचन योजनेच्या वीजबिलाचा प्रश्न यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबी आमदार सचिन पाटील यांनी या बैठकीत प्रभावीपणे मांडल्या. या मागण्यांमुळे फलटण तालुक्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


या बैठकीस राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे, पुनर्वसन मंत्री मा. ना. मकरंद आबा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्रियाताई शिंदे, आमदार अतुलबाबा भोसले, आमदार महेशदादा शिंदे, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार धैर्यशीलदादा कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभैया भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER