फलटण प्रतिनिधी :
मंगळवार दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जयश्री नागरी सहकारी पतसंस्था स्वमालकीच्या नवीन वास्तूत स्थलांतरित होणार आहे. संस्थेच्या या नव्या वास्तूत प्रवेशामुळे संस्थेच्या प्रगतीच्या प्रवासात एक नवा अध्याय सुरू होणार आहे.
सकाळी १० वाजता हा स्थलांतर सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संस्थेचे चेअरमन दयानंद राजू पडकर,व्हाईस चेअरमन राजेंद्र पांडुरंग खलाटे व संचालक मंडळ यांनी संस्थेचे सर्व सभासद व फलटण तालुक्यातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
अतिशय कमी कालावधीमध्येच जयश्री नगरी सहकारी पतसंस्थेने आपली एक वेगळी ओळख फलटण तालुक्यामध्ये केली आहे. पारदर्शक कारभार हे संस्थेचे एक खास वैशिष्ट्य आहे. संस्थेबरोबर सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याचे वेगळे कौशल्य संचालक मंडळाकडे आहे. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत सभासद, खातेदार आणि हितचिंतकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
संस्थेचा नवीन पत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, प्रगती टॉवर, हिंदुस्थान हार्डवेअरच्या वरील दुसरा मजला.
स्वमालकीच्या नवीन वास्तूतून संस्थेच्या आगामी वाटचालीला नवी दिशा मिळणार असून, या नव्या पर्वासाठी संस्थेच्या वतीने सर्वांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.















