फलटण : धैर्य टाईम्स
सिद्धी अकॅडमीतर्फे मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स (MTTC) फलटण येथे सुरु झाले आहेत. 12 वी उत्तीर्ण, पदवीप्राप्त तसेच शिक्षण अर्धवट सोडलेल्या मुली व महिलांना कोर्स केल्यानंतर नोकरीची संधी मिळणार आहे.
या MTTC कोर्समध्ये सरकारमान्य संस्थेचे प्रमाणपत्र, दररोज दोन तासांचे वर्ग, इंग्रजी बोलण्याचा सराव, प्री-प्रायमरी शाळांमध्ये नोकरीच्या संधी तसेच दोन महिन्यांचा विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव मिळण्याची संधी असल्याचे अकॅडमीतर्फे सांगण्यात आले आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर ट्यूशन्स सुरू करण्याची संधीही उपलब्ध होऊ शकते असे नमूद करण्यात आले आहे.
या कोर्ससाठी बारावी उत्तीर्ण ही पात्रता असून, शिक्षणतज्ज्ञ प्रा. मनिंद्र कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी प्राचार्या श्रीमती शाहीन शेख या प्रशिक्षण देणार आहेत. प्रवेशासाठी अधिक माहितीसाठी 9423867140 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठिकाण : सिद्धी अकॅडमी, कोणार्क एम्पायर, रिंग रोड, निकोप हॉस्पिटलजवळ, फलटण.

















