सातारा प्रतिनिधी -
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यास महानंदाचे उपाध्यक्ष डी. के. पवार, सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन अंकुशराव साळुंखे पाटील, युवा नेते शरद जाधव, डॉक्टर भिसे यांच्यासह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा बँकेच्या संचालकपदी त्यांची निवड झाल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री देसाई यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ जिल्हा बँकेला तसेच जिल्ह्यातील शेतकरी आणि सहकार क्षेत्राला होईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
दरम्यान, दीपावलीच्या निमित्ताने या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सहकार क्षेत्रातील विविध प्रश्नांसह जिल्ह्याच्या विकासासंदर्भातही चर्चा करण्यात आली.
















