सातारा दि. 8 : संपुर्ण सातारा जिल्ह्यात दि. 10 जुलै 2022 रोजी बकरी ईद हा सण साजरा होत आहे. या सणाचे निमित्ताने पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार, असलेल्या अधिकारानुसार कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक, सर्व सहा.पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस उप निरीक्षक यांचेसह बंदोबस्तावरील अन्य सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांना दि. 10 जुलै 2022 रोजी त्या-त्या पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून मिरवणुकीच्या मार्गासंबधाने मिरवणुकीतील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदुषणाच्या अनषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देणेचे अधिकार प्रदान करीत आहे.