सातारा दि.15 : वृध्दपकाळामध्ये जीवन चांगल्या पद्धतीने जगता यावे. त्याचबरोबर आर्थिक, कामाचा, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सातारा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी कक्षाची निर्मिती करण्यात आला आहे, अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या खासगी, विनाअनुदानित व अनुदानित अशा सर्व वृद्धाश्रम चालविणाऱ्यांनी आपल्या संस्थ्ोची सूपर्ण माहिती सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे सादर करावी, असे आवानही श्री. उबाळे यांनी केले आहे.