Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

अतिवृष्टीच्या काळात घडले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संवेदनशील स्वभावाचे दर्शन

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 31  :- अतिवृष्टीच्या काळात सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी अत्यंत तत्पर व अलर्ट राहून गतिमान ठेवलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे सातारा जिल्हावासियांच्यात एक सकारात्मक संदेश गेला आहे. भुस्खलन दरड कोसळणे इ. नैसर्गिक आपत्ती पासून मोरेवाडी व सातारा जिल्हयातील दरड प्रवण भुस्खलन व पूरप्रवण क्षेत्रातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिका विभाग, विदयुत महामंडळ व सर्व विभागांचा वेळोवेळी बैठक व व्हि.सी. द्वारे आढावा घेऊन नागरिकांचे स्थलांतर करणे, सोयीसुविधा पुरविणे व आवश्यक बचावात्मक उपाययोजना करून घेणे यातून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या कार्यतत्पर व संवेदनशील स्वभावाचे दर्शनच घडले.

 सन 2019 साली सातारा तालुक्यात सतत पडणारा पाऊस, अतिवृष्टीमुळे जमीन भुस्खलन होऊन मौजे मोरेवाडी ता सातारा येथील डोंगर माथ्यावर भेगा पडलेल्या होत्या. त्यामुळे सन 2021 मध्ये आलेल्या जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या सर्वेक्षण अहवालानुसार नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये नागरिकांची होणारी जिवीत हानी व वित्त हानी टाळणेसाठी सदर गावातील 18 कुटुंबांचे स्थलांतर करणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले होते. त्यांचे तात्पुरते स्थलांतर मौजे मोरेवाडी येथील कटकाचा माळ या ठिकाणी बांधण्यात आलेल्या तात्पुरता निवारा पत्राशेड याठिकाणी करण्यात आलेले आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या सूचनानुसार साताराचे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले व तहसिलदार राजेश जाधव यांनी मोरेवाडी गावातील दरड प्रवण क्षेत्रास प्रत्यक्ष भेट दिली.  शासनातर्फे मौजे मोरेवाडी येथील कटकाचा माळ या ठिकाणी बांधण्यात आलेल्या तात्पुरता निवारा पत्राशेडची पहाणी केली असता, या ठिकाणी पाणी, वीज इ. भौतीक सोयी सुविधांचा अभाव असल्याचे निर्दशनास आले. या बाबी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या निर्दशनास आणून देताच त्यांनी मोरेवाडी येथील स्थलांतरित कुटुंबाची कोणतीही गैरसोय होणार नाही याकरिता वैयक्तिक लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करणेबाबत सूचना दिल्या. याची अचूक अंमलबजावणी करत उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार राजेश जाधव, गट विकास अधिकारी अनिल वाघमारे, मंडळ अधिकारी परळी श्रीमती माधवी गोरे यांच्यासह सर्व टीम कामाला लागली. उपअभियंता महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी यांनी सतत पडणा-या पाऊसामध्येही उपस्थित राहून दोन दिवसांत १० विजेचे खांब उभे करून तात्काळ वीजपुरवठा सुरू केला. तसेच गावातील झ- यापासून तात्पुरते निवारा शेडपत्रापर्यंत पिण्याचे पाण्याची सोय केली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील भुस्खलन दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या कायमस्वरुपी स्थलांतराच्या उपाय योजनांना एका बाजूला गती देत असताना त्यांनी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजनांमध्येही कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी स्वत: केलेला पाठपुरावा हे त्यांच्या संवेदनशीलतेचे आणि कार्यतत्परतेचे उत्तम उदाहरण आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER