Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

पावसाळ्यातील साथ रोग नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

दुर्गम भागातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नेमणूकीच्या ठिकाणी राहून सेवा द्यावी - मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी
टीम : धैर्य टाईम्स

सातारा, दि. 27 – सध्या पावसाळा सुरु झाला असून, जिल्हयातील व दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रानां मोठया प्रमाणात औषधसाठ्याचा पुरवठा करण्यात आला  आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी अतिवृष्टीच्या काळात त्यांची नेमणूक असलेल्या ठिकाणी राहून आरोग्य सेवा पुरवावी अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिल्या आहेत.

पावसाळ्यात जलजन्य, किटकजन्य इ. पासून साथ परसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या करिता आरोग्य विभागाने सातारा जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत कार्यरत सर्व उपकेंद्राकडील आरोग्य कर्मचारी यांचा पावसाळा पूर्व नियोजना बाबत आढावा घेतला. पावसाळ्यातील साथ रोग नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद शिर्के यांनी यावेळी दिली.  

पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर सर्व भागातील पाणी पुरवठा योजनांचे सर्व्हेक्षण करुन, जर एखाद्या ठिकाणी गळती किंवा व्हॉल्व गळती असल्यास, त्या बाबत संबंधीत ग्रामपंचायतीस लेखी पत्र देऊन त्या बंद करणे बाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच डेग्यु, चिकनगुनिया बाबतचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली आहेत. आरोग्य विभाग व ग्राम पंचायत विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने हिवताप जनजागरण पंधरवडा राबविण्यात येत आहे. या बाबतच्या प्रत्येक तालुक्यातील आरोग्य कर्मचारी यांच्या तालुकास्तरीय आढावा सभा घेण्यात आल्या असून पावसाळयात करावयाच्या कामकाजा बाबतच्या सूचना देणत आल्या आहेत.

पावसाळ्यातील कामकाजाबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. सर्व्हेक्षणामध्ये गावातील सर्व विहीर, टाकी, प्रत्येक पेठेतील पहिले व शेवटचे घर, गटारातून गेलेले नळ या ठिकाणी ओटी टेस्ट घेणेत येत आहे. सर्व पाणी उद्भवाचे पाणी नमुने तपासणीस घेतले जात आहेत. संपूर्ण गावात प्रत्यक्ष फिरुन मुख्य पाईपलईन, खाजगी नळ कनेक्शन यामध्ये असणारी गळती शोधून काढणे व ती सर्व संबंधीत ग्राम पंचायती मार्फत तात्काळ दुरुस्ती करुन घेणे. सर्व्हेक्षणाचे वेळी ग्राम पंचायतीमार्फत गटारे वाहती करावीत. पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा व विहीरीचा परिसर स्वच्छ करावा. ग्रामपंचायतीकडे असणारे पाणी शुध्दीकरणासाठी लागणारे टि सी एल साठवणूक योग्य आहे का याची पाहणी करुन योग्य ती उपाययाजना करावी.

जिल्हयातील अतिवृष्टी होणाऱ्या जावली, महाबळेश्वर, पाटण व वाई या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रानां अतिआवश्यक असणारी औषधे श्वानदंश – 3 हजार 103, सर्पदंश - 518, जुलाबा करताच्या गोळया पऱ्यायुराझीडॉल – 3 लाख 25 हजार 413, मेट्रोनिडाझोल – 94 हजार 291, ओ आर एस – 20 हाजर 106, पॅरासिटामोल – 4 लाख 97 हजार 377 व सोडीयम हॉयपोक्लोराईड – 3 हजार 15 जादाची औषधे पुरविण्यात आली आहेत. या बरोबर संबंधीत तालुक्यातील दुर्गम भागातील अपेक्षीत प्रसुती होणाऱ्या गरोदर माता यांना संरक्षीत ठिकाणी प्रसुती करिता घेऊन जाणे इ करिता सर्व ॲम्बूलन्स सुस्थितीत ठेवण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर दुर्गम भागात किरकोळ आजारा करिता औषधे उपलब्ध होण्यासाठी  भागातील आशांना औषधसाठा देण्यात आला आहे.

पावसाळया करिता जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुकास्तर व जिल्हास्तरावर साथरोग नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. त्यामध्ये सर्व ठिकाणी 24 तास संबंधीत संस्था कार्यरत आहेत. एखादया ठिकाणी आरोग्याशी संबंधीत किंवा आकस्मित घटना घडली तर त्यासाठी साथरोग नियंत्रण कक्षाशी संपर्क क्र 02162-233025 त्वरीत संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी श्री शिर्के यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER