सातारा दि. 14 : जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दिनांक 17 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 दरम्यान महात्मा गांधी यांच्या 154 व्या जयंती निमित्त व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालया मार्फत स्वछता व देखभाल पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती सातारा येथील औैद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी दिली आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातारा येथे दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी पी.एम.स्कील रन चे आयोजन करण्यात आहे. तसेच याच दिवशी सकाळी 11.00 नंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उतीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा पदवीदान समारंभ होणार आहे.
दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी संस्थेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 20 ते 22 सप्टेंबर 2023 वृक्षरोपन, वृक्ष संवर्धन व देखभाल. दिनांक 25 ते 27 सप्टेंबर 2023 स्वच्छता मोहीम, दिनांक 29 ते 30 सप्टेंबर संस्था परिसराची स्वच्छता मोहिम दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व संस्थेतील अधिकारी कर्मचारी यांचे कडून किल्ले अंजिक्यतारा स्वच्छता मोहीम असे कार्यक्रम होणार आहे.