Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

महाज्योती तर्फे एमपीएससी आणि युपीएससी परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

टीम : धैर्य टाईम्स

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था आहे. संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग,विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी याकरीता विविध योजना राबवत असते. वर्ष 2023-24 साठी महाज्योतीतर्फे एमपीएससी आणि युपीएससी परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहे.


एमपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण
एमपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी  मोफत ऑफलाईन व अनिवासी पध्दतीने, महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. प्रशिक्षणाचा नियोजित कालावधी 11 महिने आहे. प्रशिक्षणाकरीता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास संस्थेत प्रशिक्षणाकरीता रुजू होतील त्या दिनांकापासुन महाज्योतीच्या धोरणानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्यांनाच प्रतिमाह 10,000 विद्यावेतन लागू होईल. एकवेळ आकस्मिक खर्च रुपये 12,000 देण्यात येईल.
युपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण
युपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकूण 11 महिन्यांचे पूर्व, मुख्य तसेच व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षणा सोबत अभ्याससाहित्य घरपोच देण्यात येईल. पुणे येथे प्रशिक्षणाकरिता निवास व भोजन व्यवस्था म्हणून उमेदवारांना रुपये 10,000 प्रतिमाह विद्यावेतन व एकवेळ आकस्मिक खर्च रुपये 12,000 आकस्मिक खर्च देण्यात येईल. दिल्ली येथे ऑफलाईन प्रशिक्षणाकरिता निवास व भोजन व्यवस्था म्हणून उमेदवारांना रुपये 13,000  प्रतिमाह विद्यावेतन व एकवेळ रुपये 18,000 आकस्मिक खर्च देण्यात येईल.

प्रशिक्षणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, मार्कशीट अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक जोडावे. पासबूक किंवा रद्द केलेला धनादेश जोडावा.
प्राप्त अर्जाची निकषानुसार छाननी करण्यात येईल. विद्यार्थ्यांची राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
विद्यार्थांनी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील Application Training 2023-24यावर जाऊन सर्व अटी व शर्तीचे पालन करुन दिनांक 10/04/2023 ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

महाज्योतीच्या एमपीएससी/युपीएससी पूर्व प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेल्या विद्याथ्याचे मनोगत

शीतल घोलप- युपीएससी परीक्षा पुर्व प्रशिक्षणार्थी
संगणक अभियांत्रिकीमधे पदवी प्राप्त केल्यानंतर मी युपीएससीच्या तयारीला लागले. त्यावेळी लहान भावंडाचेही शिक्षण सुरु होते. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे दिल्ली येथे जाऊन महागडे कोचिंग क्लासेस लावणे शक्य नव्हते. सोशल मध्यमातून महाज्योतीचा युपीएससी पूर्व प्रशिक्षण योजनेची माहिती. सर्व अटी शर्तीसह ऑनलाईन नोंदणी अर्ज दाखल केला. चाचणी परिक्षा दिली. आणि माझी निवड झाली. मला महज्योती मार्फत दिल्लीचा नामांकित श्रीराम आयएएस संस्थेमध्ये पूर्वपरीक्षेच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळाला. त्यादिवसापासून माझ्या विद्यावेतनास सुरवात झाली. मी परभणीतून दिल्लीला गेले. दिल्लीसारख्या महागड्या शहरात माझ्यासारख्या अनेक सर्वसामान्य विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची आणि राहण्याची सोय झाली. श्रीराम आयएएस संस्थेचे पूर्व, मुख्य आणि वैकल्पिक विषयांची सर्व पुस्तके मिळाली.

प्रदिप शिंदे - एमपीएससी परीक्षा पुर्व प्रशिक्षणार्थी
मी प्रदिप नंदकुमार शिंदे. बीफॉर्मचा विद्यार्थी आहे. सध्या एमपीएससीची तयारी करीत आहे. पण प्रॉपर मार्गदर्शन न मिळाल्याने अभ्यास केल्याचे सामाधान मिळत नव्हते. त्यावेळी फेसबुकवर महाज्योतीच्या एमपीएससी परीक्षा प्रशिक्षण योजनेबद्दल वाचले. आणि त्यात नाव नोंदविले. सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. काही दिवसात ऑनलाईन माध्यमातून एमपीएससी परीक्षा पुर्व प्रशिक्षण सुरु झाले. सुरवातीलाच कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा सांगीतले. आपल्या ध्येयाप्रती सजग केले. मी बी फॉर्मचा विद्यार्थी असल्यामुळे मला राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास हे विषय समजण्यास कठीण जायचे. पण महाज्योतीच्या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकविल्या जात असलेल्या शिक्षकांकडून ते मला समजायला सोपे जाऊ लागले. या विषयातील माझा आत्मविश्वास वाढला. महाज्योतीकडून एमपीएससी पुर्व परीक्षेची तयारी करण्याकरिता अद्ययावत, दर्जेदार शैक्षणिक साहित्य संचही देण्यात आला. त्यातून अभ्यास करतांना अधिकाधिक पुढे जात आहे. एखादे लक्ष्य गाठायचे असेल तर आपल्या साध्याबरोबर साधनेही सोबत असली पाहिजेत तरच लक्ष्य गाठता येईल. महाज्योती याची पुरेपुर काळजी घेते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER