Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

फलटण नगर पालिकेत जागतिक महिला दिन संपन्न : विविध स्पर्धांचे आयोजन

टीम : धैर्य टाईम्स

फलटण येथील नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2023 व माजी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त फलटण नगर परिषदेतील सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी खास संगीत खुर्ची, लिंबू चमचा व उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी महिलांना सन्मानपत्र त्याचबरोबर पहिल्या तीन स्पर्धकांना पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात आली.

8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. या दिवशी महिलांचा उचित सन्मान होण्यासाठी फलटण नगर परिषदेमध्ये विविध विभागातील महिलांना मुख्याधिकारी पदावर तसेच इतर विभागातील विभाग प्रमुख पदावर काम करण्याची संधी एका विशिष्ट आदेशद्वारे देण्यात आली. महिलांच्या निगडित समस्यांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा याकरिता मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी ही अभिनव संकल्पना राबवली. या अभिनव संकल्पनेमुळे संजय गायकवाड यांचे महिलांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे.

 या अभिनव संकल्पनेतून मुख्याधिकारी म्हणून श्रीमती वर्षा काशिनाथ बडदरे यांनी काम पहिले तर श्रीमती साधना सुभाष पवार यांनी वसुली अधीक्षक वसुली विभाग आस्थापना प्रमुख म्हणून कार्याभार सांभाळला. श्रीमती विभावरी विश्वनाथ देसाई - नगर अभियंता, श्रीमती सिमरन नसीमअहमद पठाण - सहाय्यक नगरारचनाकार, श्रीमती राजश्री रामचंद्र परबतराव - लेखापाल, श्रीमती काजल अंबादास शिंदे - भांडारपाल, श्रीमती काजल चंद्रकांत अहिवळे - विभाग प्रमुख नागरी सुविधा केंद्र, श्रीमती शैला नंदू पोळ - सहाय्यक निरीक्षक आरोग्य विभाग, श्रीमती मेघा संजय कर्णे - स्वच्छता निरीक्षक आरोग्य विभाग, श्रीमती सुनिता महेंद्र अहिवळे - मुकादम आरोग्य विभाग, श्रीमती सुलोचना सखाराम आत्राम - विभागप्रमुख अभिलेख कक्ष, श्रीमती शुभांगी प्रल्हाद गायकवाड - सुपरवायझर पाणीपुरवठा अग्निशमन विभाग, श्रीमती मीना धनंजय वाळा - संगणक अभियंता संगणक विभाग आदी महिलांनी एक दिवस प्रशासकीय कामकाज पहिले.

 फलटण येथील नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2023 व माजी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त फलटण नगर परिषदेतील सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी खास संगीत खुर्ची, लिंबू चमचा व उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी महिलांना सन्मानपत्र त्याचबरोबर पहिल्या तीन स्पर्धकांना पैठणी साडी बक्षीस म्हणून यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून आठ मार्च रोजी दुपारी तीन वाजता नगर परिषदेच्या आवारात करण्यात आले होते.

विविध स्पर्धेतील विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे उखाणा स्पर्धा प्रथम क्रमांक सौ. शैला पोळ, द्वितीय क्रमांक मनीषा काकडे, तृतीय क्रमांक सुरेखा जाधव, लिंबू चमचा स्पर्धा विजेती प्रथम क्रमांक काजल शिंदे, द्वितीय क्रमांक आरती काकडे, तृतीय क्रमांक स्वाती अहिवळे तर संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक आशा काकडे, द्वितीय क्रमांक आरती वाघेला, तृतीय क्रमांक काजल अहिवळे यांनी मिळवीला. यावेळी स्वच्छ भारत या विषयी प्रश्नमंजुषा घेण्यात आली. 'मुलगी वाचवा 'या संकल्पेनेचे सादरीकरण करण्यात आले. विविध स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या महिलांना पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात आली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER