पुणे : विशेष प्रतिनिधी
श्री व्ही. एन. एस. ग्रुप अर्थात शिवजल ग्रुप फलटणच्या सासवड ता. पुरंदर, जि. पुणे येथील जगवार ए बी पी मॉलचा भव्य भूमिपूजन सोहळा शुक्रवार दिनांक १२ मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार व महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते धुमाळ पेट्रोल पंपासमोर, सासवड - जेजुरी रोड, सासवड ता. पुरंदर जि. पुणे येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, संजयकाका पाटील व आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्ता व व्यावसाय प्रशिक्षक भूपेंद्रसिंह राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री व्ही. एन. एस. ग्रुप अर्थात शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी दिली.
या कार्यक्रमास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री दादासाहेब जाधवराव, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक साहेब, मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार निलेश लंके, यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री व्ही. एन. एस. ग्रुप अर्थात शिवजल ग्रुपचे चेअरमन ॲड. रितेश सावंत यांनी केले आहे.