फलटण प्रतिनिधी : एखाद्या ठिकाणी आग लागण्या सारख्या आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदत मिळवण्यासाठी फलटण नगर परिषदेने 7066268101 हा मोबाईल क्रमांक आपत्कालीन म्हणून नागरिकांना दिला आहे. आता अग्निशमन यंत्रणा सेवेसाठी फलटणकरांना 7066268101 हा एकच क्रमांक डायल करावा लागणार आहे. त्यानंतर अवघ्या काहीच मिनिटांत योग्य ती यंत्रणा घटनास्थळी पोहचणार आहे याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे.
या पत्रकात पुढे असे म्ह्टले आहे की, फलटण शहरातील सर्व नागरिकांना कळविणेत येते की फलटण नगरपरिषदेचे अग्निशमन केंद्र पेठ सोमवार सुधारित जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी कार्यान्वित केलेले असून शहरामध्ये आपत्ती निर्माण झालेस अत्यावश्यक सेवेकरिता संपर्क करणेकामी मोबाईल क्रमांक 7066268101 हा क्रमांक सदर ठिकाणी कार्यान्वित असून शहरातील तसेच शहरालगतच्या गावात काही आपत्ती निर्माण झालेस सदरच्या क्रमांकावर संपर्क साधावा सदरचा संपर्क क्रमांक हा 24 तास कार्यान्वित राहील याची दक्षता घेणेत आलेली आहे तरी याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे.