सातारा दि. 6 : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त नेहरू युवा केंद्र संगठण (NYKS) 1 एप्रिल ते 31मे 2023 या कालावधीत समुदाय आधारित संस्था " युवा संवाद – भारत @2047" या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम टाऊन हॉल स्वरुपात आयोजित केला जाईल, त्यामध्ये जाणकार व्यक्ती असतील. जे पंच प्राण वर चर्चा करतील आणि त्यानंतर प्रश्नोत्तराचे एक सत्र होईल. ज्या समुदाय आधारित संस्था अर्ज करू इच्छितात त्यांचे युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुरेसे संगठनात्मक बळ असायला हवे. संस्था विरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नसावा.कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जास्तीत जास्त ३ संस्थांना निवडले जाईल.निकष पूर्ण करणारे इच्छुक समुदाय आधारित संस्थांनी नेहरू युवा केंद्र, सातारा जिल्हा परिषद,विस्तारित इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र.७,८ येथून प्राप्त विहित अर्जामध्ये अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी एनवायके, सातारा येथे संपर्क साधावा किंवा qnyksatara@gmail.com वर ईमेल करावा किंवा ०२१६२-२२९७५२ वर संपर्क साधावा असे जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र, सातारा यांनी कळविले आहे.