Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

मतदार यादीपुनरिक्षण मोहीम सुरू ; नाव नोंदविणे, वगळणे, पत्ता बदलासाठी 24 जुलैपर्यंत मुदत

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 27 (जिमाका): भारत निवडणूक आयोग यांनी महाराष्ट्र राज्यासाठी यांनी दि.१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. सातारा जिल्हयातील या कार्यक्रमातंर्गत दि.२५ जून २०२४ ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेव्दारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देवून मतदारांच्या तपशिलाची पडताळणी संबंधीत कुटूंब प्रमुखाकडून करुन घेणार आहेत. या भेटीमध्ये नोंदणी न केलेले पात्र मतदार १ जुलै २०२४ रोजी पात्र), संभाव्य मतदार (पुढील तीन अर्हता दिनांकावर पात्र), एकापेक्षा अधिक नोंदी/मयत मतदार/कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार, लग्न होवून बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी, नविन लग्न होवून आलेल्या महिलांच्या नावची नोंदणी, दिव्यांग मतदार चिन्हांकीत करणे, मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती इ. मतदार नोंदणीच्या कामावर भर देणार आहेत.
  मतदान यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीला मतदान करावयाचे असेल, तर सर्व पात्र मतदार यांनी मतदार यादीत नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशावरून जिल्हा प्रशासनाने मतदार यादी पुनरिक्षण मोहीम हाती घेतली आहे. दिनांक 25 जून 2024 पासून ही मोहिम सुरु झालेली आहे. त्यामध्ये मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव पत्ता बदल, दुबार आणि मयत नाव वगळणे आदी कामे करण्यात येणार आहे जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी 25 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर अंतिम मतदार यादी 20 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे, येत्या तीन ते चार महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील युवकांची संख्या मोठी असून यातील बहुतांश मतदारांची नावे मतदार यादीत आहेत. मात्र उर्वरित सर्व नव युवकांचे मतदार यादीत नाव नांदविण्यासाठी जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, तसेच जनजागृती केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
  मतदार यादी अधिक अचूक करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. त्यानुसार यंदा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी (बीएलए) यांच्यासोबत मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादीची पडताळणी केली जाणार आहे. बीएलओ व बीएलए एकत्रित फिरले तर मयत व नोंदणी शिल्लक असणाऱ्या मतदारांची नांवे समजण्यास मदत होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
  ऑनलाईन अर्ज करता येणार 1 जुलै २०२४ रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या युवकांना मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे. मतदार यादीत नाव आहे किंवा कसे याबाबत www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल अॅपवर संपूर्ण नांव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदार संघ ही माहिती भरल्यानंतर माहिती समजेल. मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक ०६ भरावा, नोंदीत दुरुस्त्या, पत्ता बदलण्यासाठी ८. तर नाव वगळण्यासाठी ०७ क्रमांकाचा अर्ज भरावा. तसेच जवळील मतदान केंद्रांवर बीएलओ यांच्याकडे सुद्धा अर्ज दाखल करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली, तसेच voters.ecl.yov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज करता येणार
आहे.  मतदार यादीत नाव नोंदविणे, पत्ता बदल करणे, मयत नाव वगळणे आदीसाठी 24 जुलै२०२४ पर्यंत मुदत आहे.  प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीः 25 जुलै २०२४ प्रारूप मतदार यादीवर हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत 9 ऑगस्ट २०२४ अंतिम मतदार यादी प्रसिद्धः 20 ऑगस्ट २०२४ तरी सर्व नागरीकांनी या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहीमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा श्री. डुडी यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER