Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यांच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला आढावा

टीम : धैर्य टाईम्स


सातारा. दि 13:   संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि.18 ते 23 जून या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रम करणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, अद्याप मान्सुनला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पिण्याचे पाण्याचे स्त्रोत तसेच त्या स्त्रोतातून दिवसाकाठी किती टँकर भरले जाऊ शकतात तसेच पालखी मार्गाचे शेजारील गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत आहेत का याची खात्री करावी. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना पालखी तळ, विसावा, सुलभ शौचालय, हिरकणी कक्ष, गॅस सिलेंडर वाटप, पिण्याचे पाणी, स्नानगृह इत्यादीबाबत माहिती दर्शविणारा नकाशा ठिकठिकाणी लावावा यामुळे वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही.

पालखी सोहळ्यानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रावरील सर्व निवासी डॉक्टर यांच्या चोवीसतास कालावधीसाठी नेमणुका कराव्यात अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, पायी वारी सोहळ्यामध्ये पॅकबंद पाण्याच्या बॉटल विक्री करण्यात येते हे पाणी पिण्यायोग्य आहे अगर कसे याबाबत खातरजमा करावी यासाठी फिरत्या पथकांची नियुक्ती करावी.तसेच पालखी कालावधीत पालखी मार्गावर तसेच पालखी तळावर विज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी.
पालखी मार्गावरील मटण, मांस, बिअर बार तसेच मद्य विक्रेते यांना बंद ठेवण्याबाबत अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कार्यवाही करावी तसेच मार्गावर दर दोन कि.मी. अंतरावर वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी केल्या.
आषाढी वारी करिता ॲपची निर्मिती

आषाढी वारीकरिता वारकरी, भाविक व नागरिक यांना एका क्लिकवर आवश्यक ती सर्व माहिती संपर्क उपलब्ध होण्यासाठी व पंढरपुर येथील विठ्ठल रुक्मिणी यांचे थेट दर्शनासाठी पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनाने ॲप तयार केले आहे.

ॲप डाऊनलोड करण्यासाठी https://bit.ly/3wZUC5G  हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या  समोर एक लॉगिन चे ऑप्शन येईल तेथे google चा सिम्बॉल येईल त्यावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईमध्ये जो mail ID रजिस्टर आहे त्याचा ऑप्शन येईल त्यावरती क्लिक केल्यानंतर आपले लॉगिन ॲप मध्ये होईल.नंतर ओपन ॲप वापरायला सुरु करु शकता.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER