फलटण प्रतिनिधी :
गिरवी नाका येथील स्वरा कॉर्नर या सदनिकेच्या बिल्डरने लावलेल्या रेलिग व सदनिकेच्या समोरील एक झाड विना परवाना छाटल्या प्रकरणी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी चौकशी करून करण्याचे आदेश नगर परिषद नगररचना विभागास दिले आहेत.
फलटण शहरात नगर परिषदेच्या हद्दीत अनेक बेकायदेशीर बांधकामाचा सपाटा सुरू असून बेकायदेशररित्या बांधकाम करून सर्वसामान्या नागरिकाच्या माथी मारण्याचा प्रकार शहरात सर्वत्र घडत आहे. गिरवी नाका येथील काही दिवसापूर्वी स्वरा कॉर्नर नावाची सदनिका बांधण्यात आली असून या सदनिकेच्या बिल्डरने नगर परिषदेचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळताच सदनिकेच्या रस्त्यालगत असणाऱ्या सर्व दुकानासमोर लोखंडी रेलिंग लावून पार्किंग बंद केले. तसेच सदनिकेच्या समोर असणारे एक भले मोठे झाड नगर परिषदे कडून झाडांचा विस्तार कमी करण्याची परवानीशिवाय छाटले त्यामुळे सदर बिल्डर विरोधात महाराष्ट्र झाडे तोडणे (नियमण) अधिनियम 1964 चे कलम 3(1), 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत सविस्तपणे बातमी प्रकाशित झाली असता मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी स्वरा कॉर्नर या सदनिकेस दिलेली बांधकाम परवानगी व उपभोक्ता दाखला याबाबत व बातमी अनुषंगाने अहवाल सादर करून कारवाई करण्याच्या सूचना नगर परिषदेच्या नगररचना विभागास यांनी दिले असून अनधिकृतपणे लावलेले रेलिंग काढण्यात येणार की नाही, तसेच सदनिकेच्या समोरील झाड विनापरवाना बेकादेशीरपणे छाटून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी प्रकरणी सबंधित बिल्डर विरोधात नगर परिषद गुन्हा दाखल करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.