फलटण तालुक्यात सैनिक स्कूल सुरू करण्याची मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून केली आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांची खासदार रणजितसिंह यांनी भेट घेतली. यावेळी आमदार जयकुमार गोरे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार समाधान आवताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी दिल्ली : फलटण तालुक्यात सैनिक स्कूल सुरू करण्याची मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून केली आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांची खासदार रणजितसिंह यांनी भेट घेतली. यावेळी आमदार जयकुमार गोरे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार समाधान आवताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
माढा लोकसभा मतदारसंघ सातारा व सोलापूर या दोन जिल्ह्यात विभागला असून या मतदारसंघाची २५ लाख लोकसंख्या आहे. सातारा जिल्हा हा क्रांतीकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील युवक देश प्रेमाने प्रेरीत असल्यामुळे सैन्य भरतीसाठी कायमच अग्रेसर राहून हजारोच्या संख्येने देशसेवेत सामील झाले आहेत. अशा युवकांना योग्य प्रशिक्षण व शिक्षा मिळण्यासाठी फलटण तालुक्यात सैनिक स्कूल असणे गरजेचे आहे.