Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

पाणी टंचाईग्रस्त भागात तातडीने उपाययोजना करा - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

विहीर अधिग्रहणाचे तहसिलदारांचे अधिकार 31 जुलै पर्यंत वाढविले
टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 17 
सातारा जिल्ह्यामध्ये सदयस्थितीत खंडाळा, पाटण, जावली, महाबळेश्वर, सातारा या तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. तसेच माण, खटाव, फलटण, कोरगाव, वाई, कराड या तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विहीर अधिग्रहण करण्याच्या तहसीलदारांच्या अधिकाराला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे. कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना ही त्यांनी यावेळी तहसीलदारांना दिल्या. जिल्ह्यातील पाणी टंचाई स्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे तहसीलदारांची आढावा बैठक घेतली. 

सदर बैठकीत कमी प्रमाणात पाऊस झालेल्या तालुक्यामध्ये  उपाययोजना करणेचे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले. 

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, पाणीटंचाई संदर्भात सर्व तालुक्यांनी आराखडे यापूर्वी सादर केले आहेत. आराखडयातील गावांव्यतिरिक्त ज्या गावांची नव्याने मागणी येत आहे, त्यांचा समावेश आराखड्यात करून सदरचे पुरवणी आराखडे तातडीने जिल्हा परिषदेचे  कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग  कार्यालयाकडे सादर करावेत. विहीर अधिग्रहण, टँकर या बाबींचा प्रामुख्याने समावेश करावा. तसेच सदरचे आराखडे सादर करताना संबंधीत मंडळामध्ये किती टक्के पाऊस झाला आहे, या बाबतचा अहवाल संलग्न करावा.

ज्या ठिकाणी शासकीय टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो तेथील डिझेलची देयके तातडीने जिल्हा परिषदेकडे सादर करावीत. सदरच्या देयकांना त्वरीत निधी उपलब्ध करून दिला जाईल. डिझेल विना गावांना टॅकर मिळत नाही अशी परिस्थिती कोठेही उद्भवू नये याबाबतची सर्वानी दक्षता घ्यावी. अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही डिझेल निधीची मागणी पाठविण्याबाबत यावेळी त्यांनी सूचित केले.

ज्या तालुक्यामधे उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याबाबत मागणी होत आहे, त्यांनी सदर प्रस्ताव सातारा सिंचन मंडळाकडे तातडीने सादर करावेत. त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, असेही ते यावेळी म्हणाले.

ज्या तालुक्यातील पाझर तलाव, पाणीसाठे या ठिकाणी गाळमुक्तचे काम सुरु करता येणे शक्य असेल त्या ठिकाणी ते सुरु करावे. यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेऊन अथवा जे खाजगी शेतकरी स्वतः गाळ उपसण्यास इच्छुक असतील त्यांना सेवाभावी संस्था गृहीत धरून त्या बाबत प्रस्ताव तातडीने मृद व जलसंधारण विभागाला पाठवावेत व सदरीची कामे सुरु करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही करावी.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडील अहवालाप्रमाणे सातारा जिल्हयामध्ये खरीप हंगामामध्ये प्रत्यक्ष पेरणी 1,45,292/- हेक्टर एवढ्या क्षेत्रावर करणेत आली आहे. त्यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तृणधान्य व तुर, मुग, उडीद इ. कडधान्य तसेच भुईमुग तिळ कारळे सोयाबीन इ. गळीत धान्य तसेच कापूस या पिकांचा समावेश आहे. दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत होणा-या सरासरी खरीप पेरणीच्या प्रमाणात आज अखेर झालेली पेरणी केवळ 50 टक्केच आहे. त्यामुळे टंचाई सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी उपाययोजनात्मक कार्यवाही सुरु करण्याबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या. सद्यस्थितीत माण तालुक्यात 38 गावे व त्या अतर्गत 255 वाड्या-वस्त्यामध्ये 40 टँकर चालू आहेत. तसेच 3 विहीरी व 10 विंधनविहीरी आल्या आहेत. खटाव तालुक्यामध्ये 2 गावांमध्ये 2 टॅंकर चालू आहेत. तसेच 5 विहीरी व 14 विधनविहीरी अधिग्रहण करणेत आल्या आहेत.

कराड तालुक्यामध्ये 5 गावामध्ये 3 टैंकर चालू आहेत तसेच 6 विहीरी व 2 विंधन विहीरी अधिग्रहण करणेत आल्या आहेत.  कोरेगाव तालुक्यामध्ये ३ गावासाठी 2 टॅंकर चालू आहेत. तसेच ५ विहीरी व विधनविहीर अधिग्रहण करणेत आली आहे.  फलटण तालुक्यामध्ये २ गावे व 15 वाड्यावस्त्यामध्ये ४ टॅंकर चालू आहेत. तसेच 1 विहीर अधिग्रहण करणेत आली आहे. वाई तालुक्यामध्ये 6 गावे व वाड्यावस्त्यामध्ये टँकर चालू आहेत. तसेच ८ विहीर अधिग्रहण करणेत आली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER