Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

फरांदवाडीच्या ओढ्याचे पात्र खुले करणार की भूमाफियांना पाठीशी घालणार : उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार डॉ. अभिजित जाधव यांच्याकडे सर्वांचे लक्ष

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी:- फरांदवाडी येथील फलटण सातारा रोड परिसराच्या लगत असणाऱ्या ओढयास जाणाऱ्या नाल्यात भराव टाकून नैसर्गिक नाला बंद केल्याची बातमी प्रसिध्द होताच महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी पंचनामा करत नकाशात ओढा पात्र दिसून येत आहे पण प्रत्यक्षात ओढा पात्र दिसून येत नसल्याची बाब पंचनामा करत नमूद केल्याने आता या प्रकरणी उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार नकाशा प्रमाणे बुजवण्यात आलेल्या ओढ्याचे पात्र खुले करणार की भूमाफियांना पाठीशी घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरा लगत असणाऱ्या शेत जमिनींना मोठी मागणी असल्याने कायदा पायदळी तुडवून लाखो रुपयांचा आर्थिक फायदा होत असल्याने सर्व नियम धाब्यावर बसवण्याचे प्रकार फलटण तालुक्यात वाढले आहेत. फरांदवाडी येथील गट क्रमांक ३९ मधून ओढ्यास मिळणाऱ्या नाला गेला होता. फरांदवाडी गावचा गाव नकाशा व गट नकाशा तसेच प्रादेशिक नियोजन आराखड्यात ही एक रेघी नाला वजा ओढ्याचे पात्र सातारा रोड पासून दक्षिण उत्तर बाजूस ओढ्यास मिळत असल्याचे दिसून येते. तसेच हा ओढा पुढे बाणगंगा नदीस मिळत असल्याचे नकाशात स्पष्टपणे दिसत असताना कमी वेळेत पैसे कमविण्याच्या नादात नाला वजा ओढा बुजवून शेती प्लॉट तयार करून बेकायदेशररित्या विक्री करणाऱ्या भूमाफियांना महसुली हिसका दाखव्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारी नंतर बाणगंगा नदीकडे जाणारा मुख्य नैसर्गिक नाला भराव टाकून बुजवण्यात आल्याची बातमी प्रसिध्द होताच खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने दिनांक २४ रोजी तत्काळ घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला. यावेळी सर्व्हे नंबर ३६, ३८ व ३९ या जागेची पाहणी पंचासह केली असता महसूल विभागास नकाशात स्पष्टपणे दिसत असणारा दक्षिण उत्तर ओढा, वगळ अथवा नाला जागेवर अस्तित्वात असल्याचा दिसून आला नाही. फलटण सातारा मार्गावर एक छोटा पुल असून सदर पुला खालून पाणी येण्यासाठी अंदाजे ३० ते ४० फूट अंतरापर्यंत पाण्यासाठी मार्ग असल्याचे व पुढे ४० ते ५० फूट उपरोक्त सर्व्हे नंबर मध्ये पाण्यासाठी ओढा अगर वगळ नसल्याचे आढळून आले. याबाबत तलाठी रावसाहेब काळे यांनी पंचनामा करत नाला अगर ओढा वगळ बुजवल्याची बाब नमूद करत पंचनामा तहसिलदार अभिजित जाधव यांना सादर केला आहे.

या प्रकरणी नाला अगर ओढा वगळ बुजवल्याचा पंचनामा प्राप्त झाल्याने उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजित जाधव हे फरांदवाडी गावचा गाव नकाशा व गट नकाशा तसेच प्रादेशिक नियोजन आराखड्यात ही नमूद असणारा एक रेघी नाला वजा ओढ्याचे पात्र मोजणी करून खुले करणार का? असा सवाल लगतच्या शेतकरी यांनी केला असून भूमाफियांच्या दबावापोटी ओढ्याच्या दिशेने जाणारे पाणी वाहून जाण्यास नाला खुला करून न दिल्यास पावसाळ्यात यामुळे शेती तसेच पिकांचे मोठे नुकसान यामुळे होऊ शकते.

अनधिकृत शेती प्लॉट मुळे नाला बुजवण्यात आलेला असल्याने पावसाळयात पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक पात्र नसल्याने येत्या पावसाळ्यात येथील प्रत्येक शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजित जाधव यांनी आता या प्रकरणी कडक कारवाई करत शासकिय मोजणी करून नाला पुन्हा खुला करण्याची शेतकऱ्यांची रास्त मागणी तत्काळ पूर्ण करावी. अन्यथा पुढील काळात पावसाळ्यात नाला बुजवल्याने पाणी शेतात शिरल्याने आर्थिक नुकसान झाल्यास सबंधित महसूल अधिकारी यांना जबाबदार धरून नुकसान भरपाईची दाद मागावी लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

फरांदवाडी येथील तलाठी कार्यालय संगणक चालक किरण राजाराम जाधव यास पंचनामा करताना पंच म्हणून दाखवत सही घेण्यात आल्याने सदर पंचनाम्यावर शंका उपस्थित होत आहे.

 

 

तहसिलदार यांनी स्थळपाहाणी केली असूनयाप्रकरणी कोणालाही पाठीशी घातल जाणार नाही, जमीन महसूल अधिनियम मधील तरतूदी नुसार कारवाई केली जाईल

सचिन ढोले उपविभागीय अधिकारी फलटण

 

पंचनामा व नकाशा तपासून जिथं नाला अतिक्रमण करण्यात आला आहे ते अतिक्रमण खुल केल जाईल जिथ जिथ अतिक्रमण करून नाला बुजवून टाकण्यात आला आहे तो नियमांनुसार खुला करावाच लागेल 

डॉ अभिजित जाधव तहसिलदार फलटण

 

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER