Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा उद्या देशभरात सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल : महाराष्ट्रात याठिकाणी होणार मॉक ड्रिल? उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून संधीचे सोने करावे - धीरज अभंग तरडगाव येथे यात्रेत दोन गटात राडा : २२ जणांना अटक लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला वेव्हज 2025 : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

आपत्ती निर्माण झाल्यास नागरिकांच्या सहकार्यातून तात्काळ मदतकार्य सुरु करावे - पालक सचिव ओ.पी.गुप्ता

जिल्हास्तरीय मान्सून पूर्वतयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबतीत आढावा बैठक संपन्न
टीम : धैर्य टाईम्स
अति पावसामुळे नदी व ओढ्यांच्या पुलावरुन पाहणी वाहत असेल तर पुलांवरुन होणारी वाहतूक थांबवावी. विज पुरवठा खंडीत होणार नाही याची महावितरणने खबरदारी घ्यावी. तसेच महावितरण कार्यालयात नागरिकांच्या मदतीसाठी अधिकारी, कर्मचारी यांची 24 तास सेवा लावावी. खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांना पावसातही रस्ता दिसण्यासाठी ठळक पद्धतीने दिशादर्शक लावावे

सातारा दि.7:   जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस पडत आहे. कुठेही अतिवृष्टीमुळे आपत्ती निर्माण झाली तर त्या ठिकाणी प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्यातून तात्काळ मदतकार्य सुरु करावे, असे निर्देश  जिल्ह्याचे पालक सचिव ओ. पी. गुप्ता यांनी दिले.

जिल्हास्तरीय मान्सून पूर्वतयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकामी आढावा बैठक श्री. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली.यावेळी श्री. गुप्ता बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे,

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, महावितरणचे गौतम गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात 172 गावे पूर प्रवण आहेत. या गांवामध्ये भविष्यात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी दिर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देवून श्री. गुप्ता म्हणाले, रस्त्यांवर दरड कोसळल्याने गावांचा संपर्क तुटतो यावेळी स्थानिक नागरिकांच्या सहभागाने रस्त्यावरील दरड तात्काळ हटवावी. पेरणी होण्याच्या अगोदर शेतातील पाणी निचरा होण्यासाठी ओढ्या-नाल्यांची साफसफाई करावी. ज्या गावांचे कायमचे पुनर्वसन करावयाचे आहे त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्याचा पाठपुरावा केला जाईल.

पावसाळी हंगामात साथीचे रोग पसरु नयेत म्हणून आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी. ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालयांना ज्या स्त्रोतातून पाणी पुरवठा होते त्या स्त्रोतांची तपासणी करावी. त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण केले जाते त्याचीही तपासणी करावी. अति पावसामुळे नदी व ओढ्यांच्या पुलावरुन पाहणी वाहत असेल तर पुलांवरुन होणारी वाहतूक थांबवावी. विज पुरवठा खंडीत होणार नाही याची महावितरणने खबरदारी घ्यावी. तसेच महावितरण कार्यालयात नागरिकांच्या मदतीसाठी अधिकारी, कर्मचारी यांची 24 तास सेवा लावावी. खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांना पावसातही रस्ता दिसण्यासाठी ठळक पद्धतीने दिशादर्शक लावावे. आपत्ती संदर्भात नागरिकांकडून मदती संदर्भात मागण्या आल्या तर त्या पूर्ण करा, असे निर्देश देवून श्री. गुप्ता यांनी जिल्ह्यातील झालेली पेरणी, आत्तापर्यंत झालेला पाऊस, आपत्ती संदर्भात करावयाच्या उपाययोजना, साथ रोग पसरु नये म्हणून औषधसाठ्यांचा आढावाही त्यांनी या बैठकीत घेतला. या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संभाव्य आपत्ती संदर्भात  करावयाच्या उपाययोजनांची  सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER