फलटण : फलटण तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवाना कळविणे येते की जिल्हा परिषद सेस २०२२-२३ अंतर्गत शेतकऱ्यांनी शेती औजारे मागणीचे अर्ज फलटण पंचायत समिती कडे सादर केलेले आहेत. मंजूर उद्दिष्ट पेक्षा प्राप्त अर्जांची संख्या जास्त असलेने लाभार्थी निवड लॉटरी पद्धतीने करणेत येणार आहे.
लॉटरी पद्धतीने निवड प्रक्रिया मंगळवार दि.२/८/२०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांचे उपस्थितीत पंचायत समिती सभागृह फलटण येथे आयोजित करणेत आलेली आहे.तरी ज्या शेतकरी बांधवांनी औजारे मागणीसाठी अर्ज केलेले आहेत त्यांनी सदर लॉटरीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी डॉ.श्रीम. अमिता गावडे - पवार मॅडम यांनी केले आहे.