Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा स्वागताला फलटण प्रशासन सज्ज

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी:- श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. २० जुन २०२३ रोजी फलटण तालुक्यामध्ये प्रवेश करणार आहे. फलटण तालुक्यामध्ये माऊलींच्या पालखीचे एक उभे रिंगण (चांदोबाचा लिंब), तीन मुक्काम (तरडगांव, फलटण, बरड) व आठ विसावे आहेत. सदरच्या श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारीच्या अनुषंगाने फलटण प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे अशी माहिती फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा करण्यात आलेल्या तयारीच्या अनुषगाने फलटण तहसिल कार्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसिलदार समीर यादव, निवासी नायब तहसिलदार डी. एस. बोबडे, महसूल नायब तहसीलदार एन. डी. काळे, नायब तहसीलदार तुषार देशमुख उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले की, फलटण तालुक्यामध्ये तीनही पालखी तळांच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत आपत्कालीन व्यवस्थापन केंद्रे (EOC) स्थापन केली असून सर्व विभागांचे प्रतिनिधी त्यामध्ये समाविष्ट आहेत. सदरची केंद्रेही त्याठिकाणी पालखी मुक्कामावेळी सर्व विभागांमध्ये समन्वयाचे काम करुन वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा मिळतील याची दक्षता घेतील असे सांगितले.

फलटण तालुक्यामध्ये वारकऱ्यांना पाणी पुरवठ्यासाठी सुमारे ६५ शासकीय टँकर्सची व्यवस्था केली असून दिंड्यांसोबत असणाऱ्या ४५०-५०० टँकर्ससोबत सर्व ठिकाणी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. फलटण तालुक्यामध्ये २३ ठिकाणी टँकर भरण्यासाठी ३४ पॉईंट उपलब्ध करण्यात आले असून प्रतिदिन ७०० पेक्षा जास्त टँकर भरण्याची क्षमता आहे. तसेच पालखी मार्गावरील पाहणी शुद्धीकरणासाठी १९ पथके नियुक्त केली आहेत. सर्व ठिकाणची पाण्याची तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे.

तरडगांव, फलटण व बरड मुक्कामी पालखी असताना प्रत्येक ठिकाणी १५०० तात्पुरती शौचालये उभारण्यात येत आहेत. तात्पुरत्या शौचालयांच्या स्वच्छतेसाठी वेगळे कर्मचारी नेमण्यात आले असून पाणी पुरवठ्यासाठीही वेगळ्या टँकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. यामधील काही तात्पुरती शौचालये इतरत्र मुक्कामी असणान्या दिंड्यांच्या ठिकाणी व विसाव्यांच्या ठिकाणीही ठेवण्यात येणार आहेत. मागील वर्षापेक्षा ५०० तात्पुरती शौचालये अधिक उभारण्यात येत आहेत.

पालखी तळाच्या ठिकाणी मुक्कामापुर्वी, मुक्कामादरम्यान व मुक्कामानंतरच्या स्वच्छतेसाठी संबंधित ग्रामपंचायत व नगरपरिषदेने संपुर्ण नियोजन केलेले आहे. जिल्हाधिकारी यांनी पालखी तळ व शौचालयांच्या स्वच्छतेसाठी जिल्हास्तरावरुन अतिरिक्त १५० कर्मचारी उपलब्ध करुन दिलेले आहेत. संपुर्ण पालखी काळामध्ये आरोग्य विभागाकडील १४ स्थिर पथके वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी नेमण्यात आले आहेत. तसेच दुचाकीवरील १७ आरोग्यदूत पथके वारकऱ्यांना प्रथमोपचाराची सुविधा देतील. पालखी मार्गावर प्रत्येक किलोमीटरला १ रुग्णवाहिका अशा ३३ रुग्णवाहिका ठेवण्यात येणार असून ४ कार्डीयाक रुग्णवाहिका देखील ठेवण्यात येणार आहेत. पालखी काळामध्ये तालुक्यामधील १९० बेड्स वारकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. तसेच फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हास्तरावरुन वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांची नेमणूक पालखी काळासाठी करण्यात आली आहे.

पालखी मुक्काम व टँकर भरण्याच्या ठिकाणी वीजपूरवठा अखंडीत राहील याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच वारकऱ्यांना तात्पुरती वीज जोडण्याही सहजरित्या उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. वारकऱ्यांना पायी चालताना उन्हापासून संरक्षणासाठी १७ मंगल कार्यालये व ८ पेट्रोल पंपाच्या ठिकाणी विश्रांतीगृहे तयार करण्यात आली आहेत. त्याठिकाणी तात्पुरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पोलीस विभागामार्फत पालखी सोहळ्यासाठी पुरेसा बंदोबस्त उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच वारीमधील भुरट्या चोरांच्या बंदोबस्तासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. महिलांसाठी प्रत्येक तळावर २४X७ कार्यरत राहणारे निर्भया पथक ठेवण्यात येणार आहे. याशिवाय पालखी मार्गावर ८ ठिकाणी बंद पडलेल्या वाहनांना बाजूला करण्यासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक पालखी तळाच्या ठिकाणी २ अग्निशमन वाहने स्थापित केली जाणार असून पोलीसांकडील वाहनांमध्ये ५० अग्निशमन सिलेंडर्स ठेवणेत येणार आहेत.

अशाप्रकारे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी तहसील कार्यालय फलटण येथे २४X७ कार्यरत राहणारे दि. १८ जून ते २३ जून पर्यंत कंट्रोल रूम स्थापित केले असून त्याचा संपर्क क्र. ०२१६६-२२२२१० असा आहे. प्रशासनामार्फत सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक असलेची संपर्क पुस्तिका तयार करण्यात आली असून सर्व दिंड्यांना त्या पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

फलटण तालुक्यात पालखी सोहळा वेळी नागरिकांनी वारकऱ्यांना शौचालय वापरण्यास देवून स्वच्छता राखण्यास मदत करावी पालखी सोहळा पार पाडण्यास सहकार्य करावे असे आव्हान उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER