सातारा दि.26 : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक कार्यालयाकडून आदिवासी युवक व यवुतींना स्वयरोजगार करण्यासाठी एन.एस.टी.एफ.डी.सी. नवी दिल्ली पुरस्कृत योजनेमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मुख्य कार्यालय, नाशिक येथे अर्ज सादर करावेत.
जुन्नर येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळासाठी 9 स्वयंसहायता बचत गटांना 5 लाखापर्यंतचे कर्ज, प्रवासी वाहन व्यवसाय करणाऱ्या 4 लाभार्थ्यांना, मालवाहु व्यवसाय 4 लाभार्थ्यांना, प्रत्येकी 10 लाख व ऑटो रिक्षा व्यवसाय करणाऱ्या 4 लाभार्थ्यांना 2 लाख 40 हजार असे एकूण 21 लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.