सातारा दि. 22: पाटण, कराड तालुक्यातील कोयना नदीवरील लाभक्षेत्रातील परवानाधारक, बागायतदार, सहकारी पाणी पुरवठा संस्था यांच्या 1 जुलै 2023 ते 30 जून 2029 या कालावधीतील पाणी उपसा परवाना मंजूरीचे पुनर्विलोकनाचे (नुतनीकरणाचे) काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.
परवान्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी 7 अ चे पाणी अर्ज आपल्या नजीकच्या पाटबंधारे शाखा कार्यालयातून प्राप्त करुन 15 जून 2023 पर्यंत भरुन देण्यात यावे. ज्या लाभाधारक शेतकरी (बागायतदार) सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे पाणी अर्ज भरुन दिले जाणार नाहीत, अशा लाभधारकांची आकारणी दंडणीय दराने होऊ शकते याची नोंद घ्यावी, असेही कोयना सिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
















