Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक व निःपक्षपाती -उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि.१:  ईव्हीएम मशीन हॅक करून राजकीय पक्षांना सत्तेवर बसवले जात असून आमच्या मुलभूत हक्कावर गदा आणण्याचा डाव असल्याबाबत ओबीसी जिल्हाधक्ष भरत लोकरे यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे निवेदन प्राप्त झाले होते.  तसेच  यापुढील निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्याची त्यांनी मागणी केली असल्याचे वृत्त स्थानिक वर्तमानपत्रामधून प्रसिध्द झाले आहे.

मतदारांना आपण केलेले मतदान हे दुसऱ्या कोणासही गेले नाही याची खात्री व्हावी यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर केला जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत असणारी निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक व निःपक्षपाती आहे, असा सातारा उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी  भगवान कांबळे यांनी सदर बातमीच्या अनुषंगाने खुलासा प्रसिध्दीस दिला आहे.  

भारतात सद्यस्थितीत लोकसभा व विधानसभा निवडणुककामी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅटचा वापर करणेत येत आहे. निवडणूक काळात जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार  भारत निवडणुक आयोगाकडून या मशीन्स पुरविल जातात.  या मशीन्स जिल्ह्यांना प्राप्त झाल्यानंतर सदर मशिन्सची मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे अध्यक्ष/प्रतिनिधी, BEL इंजिनियर यांचे उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी केली जाते. त्यानंतर या मशिन्स जिल्ह्याच्या ठिकाणी असणा-या सुरक्षा कक्षामध्ये ठेवण्यात येतात. सदर सुरक्षाकक्ष बंदिस्त स्वरूपात असून हत्यारबंद सुरक्षारक्षक, डबल लॉक सिस्टीम, सीसीटीव्ही, अग्नीरोधक यंत्रणा, इत्यादी बाबींनी सुसज्ज आहे. याची जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांचेमार्फत त्याची नियमितपणे राजकीय प्रतिनिधीच्या उपस्थितीत तपासणी केली जाते.

प्रत्यक्ष निवडणुकवेळी प्रत्येक मतदान केंद्रावर जाणाऱ्या मशिन्सबाबत संपूर्ण गोपनीयता बाळगली जाते. सदर मशिन्स वितरण करताना सरमिसळ पद्धतीचा वापर केला जातो.  ही संपूर्ण प्रक्रिया ही जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे अध्यक्ष/प्रतिनिधी यांचे उपस्थितीत पार पाडण्यात येते.

निवडणूक कामी वापरण्यात येणा-या कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशीन्स ह्या ड्राय बॅटरीवर चालत असून प्रत्येक मशिनला वेगळा युनिक क्रमांक दिलेले असतात.  या मशीन्सशी कोणत्याही विद्युत लहरीतून अथवा बाह्य उपकरणाद्वारे संपर्क साधता येत नाही. सदर मशीन्समध्ये असणारी डेटा चीपमध्ये कोणी हेराफेरी करण्याचा प्रयत्न केल्यास अनऑथोराईज्ड अॅक्सेस डिटेक्शन मॉडेल कार्यान्वित होऊन पूर्ण मशीन्स डिसेबल होते, असेही खुलाशात नमुद आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER