फलटण : प्रतिनिधी
स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा अभियान निमित्त नगरपंचायत, नगर पालिका व महानगर पालिका कर्मचारी यांचे करीता फलटण येथे मर्यादित षटकांचे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन केले असल्याची माहिती फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी दिली.
शुक्रवार दिनांक 9 जून 2023 ते रविवार दिनांक 11 जून 2023 दरम्यान राज्यस्तरीय नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे फलटण येथे मर्यादित षटकांचे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बक्षीस एकवीस हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांक बक्षीस पंधरा हजार रुपये व चषक,तृतीय क्रमांक बक्षीस दहा हजार रुपये व चषक, चतुर्थ क्रमांक बक्षीस सात हजार रुपये व चषक असे असणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज व स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला पारितोषिक देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धा फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल, ( घडसोली मैदान) येथे संपन्न होणार आहेत. सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघाने सहभागी होण्याचे आवाहन फलटण नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विनोद जाधव 9860850350, विनोद अहिवळे 9762526363, स्वरूप अहिवळे 9970594440 व रुपेश इंगळे 8308622525 यांच्याशी संपर्क करावा.