फलटण प्रतिनीधी:-
43 माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने 255 फलटण (अ.जा ) विधानसभा मतदार संघामध्ये मतदान टक्का वाढवण्यासाठी मतदान जनजागृती विविध स्तरावर व ठिकाणी विविध उपक्रमाद्वारे मतदान जनजागृतीचे काम सुरू आहे.
दिनांक 1/5/2024 रोजी कोळकी ता. फलटण येथे शुभविवाह निमित्ताने वधू, वराने व वऱ्हाडी मंडळी यांनी मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला आहे.
आपलं मत आपलं भविष्य, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, असे आशय विविध घोषवाक्य द्वारे अनोख्या पद्धतीने मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. यावेळी स्वीप नोडल अधिकारी फलटण एस के कुंभार व स्वीप सहायक अधिकारी सचिन जाधव यांनी मतदानबाबत महत्व सांगितले.
यावेळी स्वीप टीम सदस्य उपस्थित होते. Sveep अंतर्गत फलटण मध्ये मतदान जनजागृती अनोखा उपक्रमचर्चा सुरु आहे तसेच या उपक्रमाचे कौतूक होत आहे.