Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार

यशस्वी व सुखी जीवनासाठी भावनांचे व्यवस्थापन गरजेचे - डॉ. गणेश लोखंडे

टीम : धैर्य टाईम्स

व्यक्तिमत्व विकास ही निरंतर व गतिशील प्रक्रिया आहे. व्यक्ती दिसते कशी यापेक्षा व्यक्ती आहे कशी
याला अधिक महत्त्व आहे. बाह्यरूप हा व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असतो, परंतु अंतर्गत व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य जबाबदारीने वाढवणे आवश्यक असते. स्वतःच्या क्षमतांना ओळखून त्या वाढवणे, स्व- कौशल्ये विकसित करणे, स्वतः च्या स्वभाव गुणांची समीक्षा करणे व समाजामध्ये स्वतःचे अंतर वैयक्तिक संबंध सुव्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. आपल्या क्षेत्रात व एकूणच समाजात  चांगले तसेच यशस्वी म्हणून ठसा उमटवयाचा असेल तर मेंदूच्या बुद्धिमत्तेच्या व्यवस्थापना इतकेच भावनिक बुद्धिमत्तेच्या व्यवस्थापनाची गरज आहे. असे विचार छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणेश लोखंडे यांनी व्यक्त केले. ते छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभाग व मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून 'व्यक्तिमत्व व्यवस्थापन' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रो. डॉ.अनिलकुमार वावरे होते.
पुढे मार्गदर्शन  करताना  डॉ.  लोखंडे म्हणाले की व्यक्तिला स्वतःच्या व इतरांच्या भावनांचे आकलन करून त्याचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. जीवनात नकारात्मकता, अपमान व मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांना सुद्धा शांत पद्धतीने सामोरे जाता आले पाहिजे.  मनोक्षमता ही आरोग्य क्षमता वाढवत असते. मन शरीराबरोबर चालते व जेथे मन शरीराची साथ सोडते तेथे आरोग्यात बिघाड सुरू होतो. व्यायाम, शांत झोप व समाजात मिसळणे या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असतात तर एकाकीपणा, जागरण व व्यसन हे आरोग्यास घातक आहे. व्यक्तीने स्वतःमधील ऋण स्थाने व बलस्थाने ओळखायला हवीत. स्वतःचे जीवन चिंतन स्व- अनुभवातून व वाचनातून  विकसित होत असल्याने वास्तवाशी सुसंगत तार्किकतेला महत्व देऊन जीवन चिंतन करायला हवे. प्रत्येक नात्यातील जबाबदारी, भूमिका व कर्तव्ये समजून घेऊन ती निकोपने पार पाडणे आवश्यक आहे. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य  प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे यांनी सांगितले की आज केवळ साक्षरता वाढवण्याऐवजी उद्योजकता व कौशल्य आधारित शिक्षणाची अधिक आवश्यकता आहे. जगात समाजाच्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करणाऱ्या तांत्रिक ज्ञानाला व कौशल्यांना  महत्त्व आले आहे. ऑनलाईन शिक्षणात जीवन कौशल्ये  देताना व आत्मसात करताना मर्यादा येतात. युवकांनी विषय ज्ञानाबरोबरच आवडीच्या व बाजारात मागणी असणाऱ्या कौशल्य क्षेत्रात करिअर करावे. कोरोना महामारी नंतरच्या जगात नोकऱ्या बाबतची स्थिती फार चांगली नाही. युवकांनी केवळ नोकरी करण्याकडे कल न ठेवता उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची जाणीवपूर्वकजडणघडणकरावी.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक- स्वागत व पाहुण्यांची ओळख महाविद्यालयातील कौशल्य विकास विभागाचे समन्वयक डॉ. संदीप किर्दत यांनी करुन दिली. आभार उपप्राचार्य डॉ. रामराजे माने -देशमुख यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र महाजन यांनी केले. यावेळी उपप्राचार्य रोशनआरा शेख, प्रा.[डॉ.] सुभाष वाघमारे, डॉ. रघुनाथ साळुंखे, प्रो. सविता मेनकुदळे, प्रो. डॉ.धनाजी मासाळ, प्रो. डॉ.शिवाजीराव पाटील व डॉ. धनंजय नलवडे यांचेसह प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER