Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी जयश्री नागरी सहकारी पतसंस्थेचे स्वमालकीच्या नवीन वास्तूत स्थलांतर दिवाळीनिमित्त ए. व्ही. ज्वेलर्स अँड सन्समध्ये आकर्षक ऑफर; सोन्याची मजुरी केवळ ६.५० टक्के! दिवाळीच्या मुहूर्तावर फलटणमध्ये ‘निसर्ग पार्क’चा गृहप्रकल्प; फलटण येथे २ बीएचकेच्या ६० बंगल्यांचा भव्य प्रकल्प - बुकिंग सुरू पालकमंत्री शंभूराज देसाई यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड; मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार ग्रामीण भागातील युवकांना दिशा देणारी दुधेबावीची व्याख्यानमाला प्रेरणादायी – न्यायमूर्ती अनिल पानसरे विमानतळ परिसरात दुचाकीस्वारांची स्टंटबाजी; नागरिकांचा जीव धोक्यात, फलटण पोलिस कारवाई करणार का? जिल्हा बँकेच्या निकालाने राजे गटाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आणली : अशोकराव जाधव दिवाळीच्या मुहूर्तावर फलटणमध्ये ‘निसर्ग पार्क’चा गृहप्रकल्प; फलटण येथे २ बीएचकेच्या ६० बंगल्यांचा भव्य प्रकल्प - बुकिंग सुरू फलटण न्यायालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; ४ हजारांची लाच घेताना खासगी वकील रंगेहात जेरबंद दुधेबावी फेस्टिव्हलचे सलग २६ व्या वर्षी आयोजन; ६ नोव्हेंबरपासून रंगणार संत गाडगेबाबा व्याख्यानमाला युवा उद्योजक, यशस्वी बिल्डर आणि धाडसी राजकीय व्यक्तिमत्त्व सागर शहा सौ. प्रिया अमोल नाळे-बोराटे यांची राज्य स्तरावर आयडॉल शिक्षक म्हणून निवड फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडीचे आवर्तन किमान ४५ दिवस सोडावे; पाणीपट्टी माफ करण्याची आमदार सचिन पाटील यांची मागणी दादांना मानलं पाहिजे! विरोधकांकडूनही रणजितदादांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे कौतुक; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दाखवली ताकद! सोसायटी मतदारसंघात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा अवघ्या 11 मतांनी पराभव; विजयापेक्षा संघर्षाचीच तालुक्यात चर्चा प्रत्येकाचे नशीब जॅकी श्रॉफ सारखे नसते एखादाच असतो ज्याला अशी संधी मिळते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी फलटणमध्ये कलम १६३ लागू; मतदान केंद्र परिसरात कडक निर्बंध - कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव श्री दत्त इंडिया साखर कारखान्याकडून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या बिलापोटी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे रक्कम वर्ग - मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांची माहिती ५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न आपली फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी लोकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची : रणजितसिंह नाईक निंबाळकर शेतकरी-जनावरांचा पाण्यासाठी टाहो, नेत्यांना पाहिजे घुंगरांचा खणखणाट! शेतकरी पाणी - चाऱ्यासाठी हवालदिल, नेते मात्र लावणीच्या तालावर दंग सांगलीतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत फलटण वकील संघाची चमकदार कामगिरी; सातारा जिल्हा गुणतालिकेत प्रथम आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती

सातारा जिल्ह्याची पर्यटनासोबत सर्वांगीण विकासाकडे वाटचाल

टीम : धैर्य टाईम्स
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर-पाचगणी येथील पर्यटन विकासासोबत जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळांचाही विकास करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात या प्रयत्नांना गती मिळाली आहे.  कास पठारावरील पर्यटन आता प्रदुषणमुक्त, पर्यावरण पुरक करण्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. पर्यटनासोबत पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे  जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही चालना देण्यात येत आहे.  

जिल्ह्याच्या विकासाला पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चालना देण्यात आली आहे. सन 2023-2024 च्या अर्थसंकल्पामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणे व वाई येथील विश्वकोष इमारत नव्याने बांधण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील मांघर मधाचे गाव हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असल्यामुळे जिल्ह्याच्या नावलौकीकात भर पडणार आहे.

कोयना, सोळशी, कांदाटी या नद्यांची खोरी निसर्ग संपन्न आहेत. या खोऱ्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 900 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.  या निधीतून परिसरातील पूल व रस्ते यांची कामे हाती घेतली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या तापोळा-महाबळेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे या भागातील पर्यटन वाढीस मदत होवून यातून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. या कामावर 75 कोटी रुपये खर्च होणार आहे.

विविध शासकीय योजनांचा जनतेला लाभ व्हावा तसेच सहज व सुलभरित्या या योजना जनतेपर्यंत पोहचाव्यात यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ दौलतनगर (मरळी) ता. पाटण येथे करण्यात आला.  यावेळी 27 हजार लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात आला. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 74 हजार 348 इतक्या लाभांचे वाटप करण्यात आले आहे.

गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला कोयना भूकंपग्रस्तांच्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लावण्यामुळे पणतू, खापर पणतू यांना भूकंपग्रस्तांचे दाखले देणे शक्य झाले आहे. नुकतेच कोयना भूकंपग्रस्तांच्या पणतू, खापर पणतू यांना भूकंपग्रस्त दाखल्यांचे वाटप करण्यात आले.  यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना आरक्षणानुसार शासकीय सेवेत काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

ग्रामीण शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे पीक उत्पादनात वाढ व्हावी यासाठी मौजे काळोली ता. पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषि संकुल उभारण्यात येणार आहे.

कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यात 6 हजार 229 लाभार्थ्यांना 32 कोटी 63 लाख रुपयांच्या विविध शेती औजारांसाठी अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत जिल्ह्यात एकूण 294 वैयक्तिक प्रस्तावांना कर्ज मंजूर झाले आहे. मुख्यमंत्री शास्वत सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिचंन संचासाठी 5 कोटी 83 लाख 47 हजार रुपयांचे पूरक अनुदान वितरण करण्यात आले आहे. अटल भूजल योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन संचासाठी 42 लाख 8 हजार रुपये पुरक अनुदान वाटप करण्यात आले आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनभर लाभ योजनेंतर्गत विशिष्ट क्रमांक मिळालेली खाती 2 लाख 17 हजार 548 असून यापैकी आधार प्रमाणिकरण झालेली खाती 2 लाख 16 हजार 370 इतकी आहेत तर आधार प्रमाणीकरण बाकी खाती- 1 हजार 169 आहेत.आधार प्रमाणिकरण पूर्ण झालेल्या खात्यांपैकी   1 लाख 93 हजार 567 लाभार्थ्यांच्या खात्यावर   685 कोटी  रुपये जमा झाले आहेत.

जिल्हा वार्षिक योजना  (सर्वसाधारण)  सन 2023-24 करिता रुपये 460 कोटी निधी म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत 11.92 टक्के इतका जास्त निधी जिल्ह्यासाठी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा 350 वे वर्ष सुरू आहे. या योजनेतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त गड किल्ले जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत (3 टक्के) निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला असून सन 2023-24 मध्ये जिल्ह्यासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.

शासनाच्या सहकार्याने सातारा जिल्हा परिषदेमार्फत संपूर्ण स्वच्छता विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर प्लास्टिक विघटन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. असा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य आवास योजना अंतर्गत सन 2022-23 मध्ये 4 हजार 343 घरकुले बांधण्यात आलेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल करिता जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेंतर्गत घरकुल योजनेसाठी पात्र पण भूमिहीन /बेघर अशा 44 लाभार्थ्याना प्रति लाभार्थी 500 चौरस फूट पर्यंत जागा खरेदीसाठी 22 लाख अनुदान उपलब्ध करुन दिले आहे.

कोयना प्रकल्पाच्या अनुषंगाने गठीत उच्चस्तरीय समन्वय समितीच्या मंत्रालय मुंबई आयोजित बैठकांमध्ये प्राप्त अर्जावर तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आल्या असून जिल्ह्यातील उपलब्ध जमीन पसंती कार्यक्रम राबवून त्याप्रमाणे तात्काळ वाटप करण्याची सूचना देण्यात आली आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात आलेल्या मुल्यांकनात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा ‘अतिउत्तम’ श्रेणीमध्ये समावेश केला आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर येथे व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची परिणामकारकता मुल्यांकन अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची नोंद ‘खुप चांगले’ श्रेणीत केली आहे. या श्रेणीत देशातील 20 व्याघ्र प्रकल्प असून स्थापनेपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा समावेश प्रथमच या श्रेणीत झाला आहे.

शासनाच्या निधीमधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि लगतच्या क्षेत्रातील गावांच्या विकास रोजगार निमिर्तीसाठी कांदाटी, मुनावळे - बामणोली, कोयना - हेळवाक, पाणेरी, मणदूर आणि आंबा ही पर्यटन क्षेत्रे विकसित करण्यात येत असून त्यामधून स्थानिकांच्या उत्पन्न वाढीस चालना मिळणार आहे. तसेच रासाटी, हेळवाक पर्यटन संकुलांतर्गत पर्यटकांसाठी नैसर्गिक पाऊलवाटा, जंगल सफारी, ऐतिहासिक पर्यटन आणि आकर्षक बस, सायकलिंग अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेत.

राज्य बाल निधीतून कोविड 19 मुळे एक पालक, दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 336 बालकांना शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक साहित्य, वसतीगृह शुल्क यासाठी 24 लाख 27 हजार 317 रुपये इतका निधी देण्यात आला आहे.

सातारा जिल्हा परिषदेमार्फत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व स्मार्ट प्राथमिक शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत सुरुवातीला जिल्ह्यातील प्रत्येकी पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व शाळा यांचा समवेश करुन पाच आरोग्य केंद्र व शाळांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी शासन विविध योजनांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देत आहे.  विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यामध्यमातून सर्व सामान्यांचे जीवन परिवर्तन होत आहे. 

संकलन , जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER