सातारा दि.15 : युवक-युवतींमध्ये कौशल्याची जनजागृती होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रविवार दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेत पी.एम. स्कील रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या नजिकच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व युवक-युवतींकरीता ही स्पर्धा खुली व मोफत आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संस्थेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पी.बी. देशमाने यांनी केले आहे.