Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

निवडणूक विषयक तयारी पूर्ण : सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी :- लोकसभा सार्वत्रीक निवडणूक 2024 चे अनुषंगाने 43 माढा लोकसभा मतदार संघ अंतर्गत 255 फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील निवडणूक विषयक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती 43 माढा लोकसभा मतदार संघ अंतर्गत 255 फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

43 माढा लोकसभा मतदार संघ अंतर्गत 255 फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघामध्ये 163939 स्त्री मतदार 172046 पुरुष मतदार 14 इतर असे 335999 एकूण मतदार आहेत. मतदान केंद्राची संख्या 341 असून प्रत्येक मतदान केंद्रावर 1 मतदान केंद्राध्यक्ष, 4 मतदान अधिकारी व 1 मतदान कर्मचारी नियुक्त करणेत आलेला आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर 1 पोलीस कर्मचारी तैनात करणेत आलेला आहे. 43 माढा लोकसभा मतदार संघ अंतर्गत 255 फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघामध्ये राखीव अधिकारी/कर्मचारी यांचेसह एकूण 2625 अधिकारी/कर्मचारी तैनात करणेत आलेले आहेत.

दि.7/5/2024 रोजी होणा-या मतदानाच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी यांना दि.6/5/2024 रोजी सकाळी ठिक 9 वाजता शासकीय धान्य गोदाम, अधिकार गृहासमोर, फलटण या ठिकाणी बोलावणेत आलेले आहे. सदर ठिकाणी एकूण 17 टेबल वरुन साहित्य वाटपाचे काम करणेत येणार आहे. तसेच 2 टेबल राखीव ठेवणेत आलेली आहेत. मतदान साहित्य संबंधीत अधिकारी/कर्मचारी यांचे ताब्यात दिलेनंतर सर्व मतदान अधिकारी/कर्मचारी यांना एस.टी. बसेस व इतर वाहनाने मतदान केंद्रावर पोहोच करण्याचे नियोजन करणेत आलेले आहे. त्यासाठी 51 एस.टी. बसेस व 3 जीप व्दारे सर्व अधिकारी/कर्मचारी एकूण 341 मतदान केंद्रावर पोहोच करणेत येणार आहे.

43 माढा लोकसभा मतदार संघ अंतर्गत 255 फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघामध्ये असणा-या सर्व 341 मतदान केंद्राची स्वच्छता मागील दोन-तीन दिवसापासून करणेत आलेली आहे. तसेच मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरविणेत आलेल्या आहेत. तसेच मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांची चहा/नाश्ता/जेवणाची व्यवस्था स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून करणेत येणार आहे.

तसेच दि.7/5/2024 रोजी पहाटे 5.00 वाजले पासून मध्यवर्ती निवडणूक कक्षामध्ये मतदान केंद्रावरील ई.व्ही.एम. मशीन्स व व्ही. व्ही.पेंट मध्ये येणा-या तांत्रीक बिघाडाचे निराकारण करणेकामी 13 तांत्रीक दृष्ट्या तज्ञ व्यक्तींचे पथक तैनात करणेत आलेले आहे. दि.7/5/2024 रोजी मतदानाची दर दोन तासांची आकडेवारी संकलीत करणे व त्याची डाटा इंट्री करणे यासाठी दोन स्वतंत्र पथके नियुक्त करणेत आलेली आहेत.

तसेच दि.7/5/2024 रोजी मतदान संपले नंतर सर्व 341 मतदान केंद्रावरील मतदान साहित्य जमा करुन घेणेसाठी एकूण 23 टेबल ठेवणेत आलेले आहेत. प्रत्येक टेबलवर 15 मतदान केंद्राची स्विकृती करणेत येणार आहे. कोणताही अनुचीत प्रकार होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेणेत आलेली आहे. तसेच अधिकार गृह परिसर व शासकीय धान्य गोदाम परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असलेबाबत 43 माढा लोकसभा मतदार संघ अंतर्गत 255 फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगीतले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER