सातारा दि. 18 : प्रशासकीय कामाकाजाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह हे बुधवार दि. 20 जुलै 2022 रोजी कराड येथे येणार असून या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 वेळेत मिटींग हॉल, चौथा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, कराड येथे कराड तालुक्यातील महसूल विषयक कामकाजाविषयी अडचणी जाणून घेवून मार्गदर्शन करणार आहेत. ज्या नागरिकांना महसूल विषयक कामकाजाच्या अडचणी मांडावयाच्या आहेत त्यांनी बुधवार दि. 20 जुलै रोजी वेळेत हजर रहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.