सातारा, दि.30 : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची तिमाही बैठक सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या सोमवारी म्हणजे 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे, अशी माहिती उपायुक्त (महसूल) तथा सदस्य सचिव विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, पुणे यांनी दिली आहे.
तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाय योजनांबाबत पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आढावा बैठक नियमितपणे घेण्यात येते. ही बैठक सर्वसाधारपणे तीन महिन्यानंतरच्या पुढील महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी आयोजित करण्यात येते. त्यानुसार पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची तिमाही बैठक सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या सोमवारी म्हणजे 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता सभागृह क्र. 1 विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत येथे आयोजित करण्यात आलेली आहे.