आयबीपीएस अंतर्गत झालेल्या बँकिंग स्पर्धा परिक्षेत लक्ष्मीनगर फलटण येथील कु. प्रियांका आगम उत्तीर्ण झाल्याने त्यांची वर्ग १ च्या मार्केटिंग ऑफीसर पदावर निवड होऊन युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या पूर्वपरीक्षेत कु. आगम मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरल्या. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये मुख्य परीक्षा दिली. व मार्च २०२२ मध्ये तोंडी परीक्षेसह उत्तीर्ण झाल्या.
फलटण : आयबीपीएस अंतर्गत झालेल्या बँकिंग स्पर्धा परिक्षेत लक्ष्मीनगर फलटण येथील कु. प्रियांका आगम उत्तीर्ण झाल्याने त्यांची वर्ग १ च्या मार्केटिंग ऑफीसर पदावर निवड होऊन युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या पूर्वपरीक्षेत कु. आगम मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरल्या. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये मुख्य परीक्षा दिली. व मार्च २०२२ मध्ये तोंडी परीक्षेसह उत्तीर्ण झाल्या.
कु. प्रियांका आगम ह्या सेवानिवृत्त वरिष्ठ महाविद्यालयीन प्राद्यापक श्री. धनाजी आगम यांच्या कन्या असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण भरणे ता. खेड, जि. रत्नागिरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत व नवभारत विद्यालयात झाले. उच्चशिक्षण फलटण येथील मुधोजी महाविद्यालय, कराड येथील गव्हर्नमेंट इंजिनिअरींग कॉलेज मध्ये सिव्हिल इंजिनिअरींग, सावर्डे ता. चिपळूण येथील सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे एमएमएसचे शिक्षण पूर्ण केले.
एमपीएससी आणि यूपीएससी नंतर स्पर्धात्मक परीक्षेचे क्षेत्र म्हणून बँकिंग क्षेत्राकडे पहिले जाते. त्यामुळे कु. प्रियांका आगम यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून त्यांच्या या निवडी बद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, प्रा. शंकर राऊत, फलटण येथील व्हरटेक्स स्टडी पाँईट ग्रंथालयीन कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.