सातारा : सधन कुक्कुट विकास गट स्थापन करणे या योजनेच्या 50 टक्के अनुदान लाभासाठी खंडळा तालुक्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत पंचायत समिती, खंडळा पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वि.तु. सावंत यांनी केले आहे.
योजनेंतर्गत एकूण प्रकल्प किंमत 10 लाख 27 हजार 500 असून सर्व प्रवर्गातील लाभार्थींना शासनाचे पन्नास टक्के अनुदान म्हणजे 5 लाख 13 हजार 750 देय असून उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थीने स्वत:चा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभारायाचा आहे. योजनेच्या लाभासाठी लाभार्थी 18 ते 60 वर्ष वयोगटातील असावा, असेही डॉ. सावंत यांनी कळविले आहे.