Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

फलटण भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांवर कारवाईची केली मागणी
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी:- फलटण भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभारा विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी लेखी स्वरुपात करण्यात आली आहे. 

राज्यपाल,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, जमा बंदी आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा भूमि निरीक्षक, उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, फलटण यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, फलटण भूमी अभिलेख कार्यालय फलटण येथे कार्यालयातील उपअधीक्षक सचिन पवार, मुख्यालय सहाय्यक सोनवलकर, निमतानदार बाबर, भुकरमापक, दुरुस्ती लिपिक, अभिलेख कक्ष लिपिक, व ईतर सर्व कर्मचारी यांनी भूमी अभिलेख कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या धोरणाच्या व महसूल विभागाच्या नियमाच्या विरोधात जाऊन अनेक खाजगी कर्मचाऱ्यांची बेकायदेशररित्या नेमणूक केली असून सदर नेमणूक ही नियमबाह्य व शासनाच्या धोरणाच्या विरोधात आहे. खाजगी कर्मचाऱ्यांची कोणकोणत्या शासकीय कर्मचाऱ्यांनी नेमणूक केली, त्यांना पगार कोण, किती व कुठून दिला जातो याची चौकशी व्हावी. खाजगी कर्मचाऱ्यांची नेमणूक करणाऱ्या उपअधीक्षक सचिन पवार, मुख्यालय सहाय्यक सोनवलकर, निमतानदार बाबर, भुकरमापक, दुरुस्ती लिपिक, अभिलेख कक्ष लिपिक, व इतर सर्व कर्मचारी यांच्यावर चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. तत्काळ भूमी अभिलेख कार्यालयात काम करणाऱ्या सर्व खाजगी कर्मचाऱ्यांना काढण्यात यावे. सर्व कर्मचारी याचा सहभाग असून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच फलटण भूमी अभिलेख कार्यालय फलटण येथे उपअधीक्षक सचिन पवार, मुख्यालय सहाय्यक सोनवलकर, निमतानदार बाबर,भुकरमापक, दुरुस्ती लिपिक, अभिलेख कक्ष लिपिक, व इतर सर्व कर्मचारी यांनी भूमी अभिलेख कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या धोरणाच्या व महसूल विभागाच्या नियमाच्या विरोधात जाऊन अनेक शासकीय मोजणी व ईतर मोजणी अभिलेख गहाळ केले असून यामध्ये खाजगी कर्मचाऱ्यांची सुद्धा अभिलेख गहाळ करण्यात सहभाग असून कोणकोणत्या शासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांनी कोण कोणते अभिलेख गहाळ केले आहेत, किती अभिलेख गहाळ आहेत चौकशी करावी. अभिलेख गहाळ झाल्यानंतर पोलिस ठाण्यात अभिलेख गहाळ प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत का, वरिष्ठ कार्यालयास अभिलेख गहाळ प्रकरणी अवगत केले आहे का, सार्वजनिक अभिलेख अधिनियम नुसार अभिलेख गहाळ प्रकरणी कारवाई केली गेली आहे का, याप्रकरणी जबाबदार सर्व कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे तसेच फलटण तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात शासकीय कर्मचारी असताना अनेक खाजगी कर्मचारी मोजणी करणे, अभिलेख दुरुस्ती करणे, नक्कल कामे खाजगी कर्मचारी करत आहेत. यांच्यावर चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्याकडून खाजगी कर्मचारी प्रचंड रक्कम मागणी आर्थिक पिळवणूक करत आहेत. याबाबत भूमी अभिलेख कार्यालयात काम करणाऱ्या खाजगी कर्मचारी यांच्यावर तत्काळ चौकशी आणि कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्याकडून खाजगी कर्मचारी प्रचंड रक्कम मागणी आर्थिक पिळवणूक करत आहेत. अनेक शेतकऱ्यांना मोजणी संदर्भातील कामे करून देतो म्हणून लाखो रुपये उकळणाऱ्या खाजगी कर्मचारी व त्यांना नेमणाऱ्या उपअधीक्षक सचिन पवार, मुख्यालय सहाय्यक सोनवलकर, निमतानदार बाबर, भुकरमापक, दुरुस्ती लिपिक, अभिलेख कक्ष लिपिक, व इतर सर्व कर्मचाऱ्याची चौकशी व्हावी. कोण कोणत्या शेतकऱ्यांची लूट केली आहे याबाबत अधिक चौकशी करण्यात यावी तसेच वरील प्रकरणी शेतकऱ्यांवर फार मोठा फलटण तालुक्यामध्ये अन्याय होत असून फार मोठ्या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार होत आहे व शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. जमाबंदी आयुक्त यांनी अचानक तपासणी करून खाजगी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत व त्यांना कामावर ठेवणाऱ्या कर्मचारी यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी. सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई तत्काळ न केल्यास तसेच पुढील दिवसात खाजगी कर्मचारी आढळून आल्यास आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटने मार्फत जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या तोंडाना काळे फासून आंदोलन करावे लागणार असून महसूल विभाग महाराष्ट्र शासन व भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासन यांनी आंदोलन करण्यास भाग पाडू नये असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी धनंजय महामुलकर,जिल्हा अध्यक्ष सातारा स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रमोद गाडे, राज्य प्रवक्ते युवा आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना,नितीन यादव, अध्यक्ष, फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना, रविंद्र घाडगे, जिल्हा सरचिटणीस स्वाभिमानी शेतकरी संघटना, बाळासो शिपकुले, प्रल्हाद अहिवळे, जितेंद्र खानविलकर, बाळासो खानविलकर व ईतर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER