Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

एकल प्लास्टिकचा वापर टाळा... प्रदूषणाला बसेल आळा

टीम : धैर्य टाईम्स
प्लास्टिकचे विघटन होत नाही आणि त्याला जाळून नष्टही करता येत नाही. प्लास्टिक जाळल्यास त्यामधून विषारी वायू बाहेर पडतात. तसेच या गोष्टींवर प्रक्रिया करुन त्यांचा पुनर्वापरही करता येत नाही. म्हणूनच प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा विचार केला तर सर्वाधिक वाटा हा या एकल प्लास्टिकचाच असतो,

एकल वापर प्लास्टिक या नावावरुनच स्पष्ट होते की प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा गोष्टी ज्यांचा
वापर एकदाच केला जातो. एकदा वापरुन या गोष्टी फेकून दिल्या जातात. मात्र त्यांची विल्हेवाट सहजपणे लावता येत नाही. प्लास्टिकचे विघटन होत नाही आणि त्याला जाळून नष्टही करता येत नाही. प्लास्टिक जाळल्यास त्यामधून विषारी वायू बाहेर पडतात. तसेच या गोष्टींवर प्रक्रिया करुन त्यांचा पुनर्वापरही करता येत नाही. म्हणूनच प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा विचार केला तर सर्वाधिक वाटा हा या एकल प्लास्टिकचाच असतो, असे समोर येत आहे. दिनांक 1 जुलै पासून सर्वत्र एकल वापर प्लास्टिकला बंदी घालण्यात आली. अशा प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई सुध्दा करण्यात येणार आहे. यामध्ये नित्य वापरात आपण कोणत्या प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या वापरतो याविषयी माहिती देणारा लेख...

केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाच्या दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजीच्या
अधिसुचनेनुसार 1 जुलै 2022 पासून एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

दैनंदिन वापरातील प्लास्टिक

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एकल वापर प्लास्टिक कुठे कुठे वापरलं जात तर कान कोरण्यासाठी
वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या काड्या म्हणजेच इयर बड्स स्टीक्स, बलून स्टीक्स, प्लास्टिकचे झेंडे,
लॉलीपॉपमध्ये वापरण्यात येणाऱ्या काड्या, आइस्क्रीमच्या काड्या, थर्माकॉलपासून बनवलेलं सजावटीचं
सामान, प्लास्टिकचे कप, प्लास्टिकच्या प्लेट्स, प्लास्टिकपासून बनवलेले काटे चमचे, शितपेय पिण्याच्या
नळ्या (स्ट्रॉ), आमंत्रण कार्ड, सिगारेटच्या पाकिटाभोवती प्लास्टिक फिल्म गुंडाळणे किंवा पॅक करणे,
मिठाईच्या बॉक्सवर वापरलं जाणार आवरण, पत्रिकांवर शोभेसाठी वापरलं जाणार प्लास्टिक, आणि 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाड असणारं सर्व प्रकारचं प्लास्टिक हे एकल वापर प्लास्टिक मध्ये मोडते.
याबरोबरच महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना 2018 अंतर्गत सर्व प्रकारच्या हँडल असलेल्या
व नसलेल्या प्लास्टिक पिशव्या, कचरा व नर्सरीच्या पिशव्या सोडून कंपोस्टेबल प्लास्टिक, सर्व प्रकारच्या
पॉलीप्रोपिलीन पासून बनवलेले नॉन ओव्हन बॅग्ज तसेच एकल वापर प्लास्टिकचे उत्पादनास मार्च 2018
पासून प्रतिबंध करण्यात आला आहे.

व्यायामाच्या माध्यमातून स्वच्छता

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेतर्फे प्लॉगेथॉन (जॉगिंग विथ पिकिंग
अप लिटर) मोहिम राबविण्यात आली. उत्तम आरोग्यासाठी अनेकांना सकाळी फिरण्याची सवय असते. याला कचरा संकलनाची जोड दिल्यास समाजासाठीही काही केल्याचे समाधान जॉगर्सना मिळाले. पुणे शहरातील एकूण 134 रस्त्यांवर सुमारे दीड लाख नागरिकांनी प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी पुणे प्लॉगेथॉन मध्ये सहभाग नोंदवला. विविध टेकड्या रामनदी, पुणे शहरातील विविध नदी घाट येथेही स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिक वेगवेगळ्या मार्गांनी नद्या आणि समुद्रामध्ये पोहोचतं. तसेच प्लास्टिकचे छोटे छोटे कण
पाण्यामध्ये मिसळतात. यामुळे नद्या आणि समुद्राचं पाणीही दुषित होतं. त्यामुळेच प्लास्टिकवर बंदी घातली तर निर्माण होणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याच्या प्रमाणामध्ये घट होईल आणि याचं नियोजन योग्य पद्धतीने होऊ शकेल.

दंड..

प्लास्टिक वापराबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर माल जप्त करणे, पर्यावरणीय नुकसान भरपाई
आकारणे,उद्योग, व्यावसायिक आस्थापना यांचे कामकाज बंद करणे तसेच पहिल्या गुन्ह्याप्रकरणी 5 हजार रुपये, दुसऱ्या प्रकरणी 10 हजार रुपये दंड आकारला जाईल तर तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी 25 हजार रुपये दंड व 3 महिन्याचा कारावास अशी कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व उत्पादक, साठवणूकदार, वितरणकर्ता, दुकानदार, ई कॉमर्स कंपन्या, रस्त्यावर विक्री करणारे व्यावसायिक, मुख्य बाजार विक्री केंद्र, सिनेमागृह, पर्यटन ठिकाणे, शाळा, कार्यालयीन इमारती, रुग्णालये, खाजगी संस्था तसेच सामान्य नागरिकांनी एकल प्लास्टिक वापर टाळून प्रदूषणाला आळा घालण्याचा प्रयत्न करणे ही सर्वांची जबाबदारी आहेच पण सुदृढ भविष्यासाठी गरजेचे आहे. तेव्हा एकल प्लास्टिकचा वापर टाळा.. त्यामुळे निश्चितच प्रदूषणाला बसेल आळा.

गीतांजली अवचट, माहिती सहायक
विभागीय माहिती कार्यालय, पुणे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER