सातारा, दि. 26 – महाराष्ट्र शासनाच्या अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत दिव्यांग (अस्थिव्यंग) बालकांसाठी मोफत शिक्षण, वसतीगृह व गरजेनुसार अस्थिवंयोपचार शस्त्रक्रिया व कृत्रिम अवयव पुरवण्याच्या सुविधा पुरणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय निवासी संस्था किल्ला भाग मिरज येथे कार्यरत असून सन 2023- 24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तरी प्रवेशासाठी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
मोफत शिक्षण सुविधा – संस्थेच्या परिसरात 1 ली ते 4 थी पर्यंत मोफत प्राथमिक शिक्षण, इ. पाचवी पासून पुढील शिक्षण माध्यमिक शाळेत, माध्यमिक शाळेत जाणे व येणेकरिता मोफत वाहतुकीची सुविधा, पाठ्यपुस्तके, वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मोफत, मुलींसाठी विशेष काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक.
वसतीगृह सुविधा – वसतीगृहात दिव्यांग मुला- मुलींची स्वतंत्र निवास व्यवस्था व मोफत जेवण, प्रत्येक विद्यार्थ्यास कॉट, गादी, बिछाना व इतर साहित्याचा मोफत पुरवठा, दररोज आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय, शुद्ध व थंडगार पाण्याची सुविधा.
शस्त्रक्रिया भौतिकोपचार सुविधा – अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गरजेनुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचाराची सुविधा, गरजेनुसार कृत्रिम अवयव, कुबड्या, तीन चाकी सायकल वाटप, वयोगट 0-6 करिता मोफत अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर अंतर्गत भौतिकोपचार.
प्रवेशाबाबत अटी – प्रवेशित अस्थिव्यंग असला पाहिजे, वयोगट 6 ते 17, प्रवेश अर्जासोबत सिव्हील सर्जन यांनी दिलेल्या अपंगत्वाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, 3, फोटो.
प्रवेश अर्ज, अधिक्षक, शासकीय अपंग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बी.एस.एन.एल. ऑफिस शेजारी, मिरज – 416410 या पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाद्वारे मोफत मिळतील. अधिक माहितीसाठी 9325555981, 9552234586, 9422216459 या क्रमांकावर संपर्क साधावा.