पुणे - प्रतिनिधी
भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण व इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारे प्राध्यापक गणेश नांदले यांच्या श्रीराम अकॅडमीचा भव्य शुभारंभ शनिवार दिनांक २४ जून २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता होत आहे. यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध परिपूर्ण मराठी व्याकरण व संपूर्ण इंग्रजी व्याकरण या पुस्तकांचे लेखक प्राध्यापक बाळासाहेब शिंदे व आयकर सहआयुक्त, मुंबई तुषार मोहिते हे उपस्थित राहणार आहेत. तर लेखक चणबसू बगली, छाबडा हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज महाबळेश्वर चे प्राचार्य मोहन भनगे, पिंपरी चिंचवडचे उद्योजक अनिल वाणी, इंडियन युथ स्पोर्ट असोसिएशनचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक कटारिया यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
श्रीराम अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार असून लेकीचे शंभर टक्के हमी देणार असल्याचे प्राध्यापक गणेश नांदले यांनी सांगितले. तलाठी, लिपिक, ग्रामसेवक, स्टाफ सिलेक्शन, एस.आर. पी. एफ.आर्मी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना योग्य ते मार्गदर्शन या अकॅडमी मधून दिले जाणार आहे.
श्रीराम अकॅडमी मध्ये तज्ञ व अनुभव शिक्षक वृंद त्याचबरोबर प्रत्येक आठवड्याला लेखी सराव परीक्षा घेतली जाणार आहे. प्रशस्त हॉल, गेस्ट लेक्चर, दररोज मैदानी सराव, सुसज्ज ग्रंथालय त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडूंचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे.
श्रीराम अकॅडमी, पिंपरी स्टेशनरोड, के. एस.बी. बेरिंग कंपनी गेट समोर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी पुणे या ठिकाणी शनिवार दिनांक २४ जून २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार असून अधिक माहीतीसाठी ९८२२०२०१५५ व ९९६०००२२३३ या भ्रमणध्वनी क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.