सातारा दि.23 : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी विधान सभा मतदार संघ स्तरावरील (FST,VST,SST,VVT) विविध पथकांचे आदर्श आचार संहिता FST,VST,SST,VVT कार्यपध्दती, सीव्हिल, ईईएम, ई एस एम एस, व्हिडीओग्राफी संबंधी सूचना या विषयांचे प्रशिक्षण स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्येशीय सभागृह, जिल्हा परिषद, सातारा येथे पार पडले.सदर प्रशिक्षणास विधान सभा मतदार संघ स्तरावरील (FST,VST,SST,VVT) पथके, MCC पथक, निवडणूक खर्च व्यवस्थापन पथके व तसेच ऑनलाईन माध्यमातून Videographers अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.
Modal Code of Conduct, FST, VST, SST, VVT कार्यपध्दती याबाबतचे प्रशिक्षण,सुधाकर भोसले, उपविभागीय अधिकारी,सातारा यांनी दिले. CVIGIL या विषयाबाबतचे प्रशिक्षण जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी संजीव कुलकर्णी यांनी दिले. तसेच EEM, VIDEOGRAPHY संबंधी सूचना या विषयाबाबतचे प्रशिक्षण मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प.सातारा राहूल कदम यांनी दिले. तसेच जिल्हा कोषागार अधिकारी सातारा यांनी ESMS या विषयाचे प्रशिक्षण आरती नांगरे यांनी दिले.
सदर प्रशिक्षणास जिल्हयातील सर्व निवडणूक नायब तहलिसदार, भरारी पथकातील (FST,VST,SST,VVT) नियुक्त् केलेले अधिकारी/कर्मचारी तसेच तालुकास्तरीय उपकोषागार अधिकारी व तालुकास्तरीय कोषागार कार्यालयातील कर्मचारी असे एकूण 374 अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणाचे नियोजन उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा नोडल अधिकारी प्रशिक्षण व्यवस्थाप विजया यादव, यांनी केले. विक्रांत चव्हाण, उपजिल्हाधिकारी महसूल हे देखील सदर प्रशिक्षणास उपस्थित होते.