फलटण प्रतिनीधी:- दिनांक १६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमाराला फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत आगामी लोकसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने शहर पोलीस ठाणे हद्दीतील जातीय व राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या भागात शहर पोलिस प्रशासनाकडून रूट मार्च काढण्यात आला होता.
शहर पोलिस प्रशासनाकडून उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, सहा. पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सुरज शिंदे यांच्यासह रूट मार्च हा गजानन चौक फलटण येथून चालू होऊन जबरेश्वर मंदिर - श्रीराम मंदिर -टोपी चौक -बादशाही मस्जिद -पाचबात्ती चौक -रविवार पेठ -आखरी रस्ता- कुरेशी नगर- कुरेशी मशिद -नायरा पेट्रोल पंप- बारामती फुल -सोमवार पेठ -मंगळवार पेठ -बारामती चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक- फलटण बस स्थानक या मार्गाने रूट मार्च काढण्यात आला.
या रूट मार्च मध्ये फलटण शहर पोलिस ठाण्याचे ३ पोलिस अधिकारी ,१४ पोलिस अंमलदार, १ आर.सी.पी.सेक्शन तसेच बी.एस.एफ.चे ३ अधिकारी १८ जवान व ४ शासकीय चार चाकी वाहने, १ ॲम्ब्युलन्स , १ अग्निशमन वाहन रूट मार्चमध्ये सामील होते. तसेच फलटण एसटी स्टँड येथे फलटण शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी अंमलदार यांची मॉकड्रील घेण्यात आली.