सातारा दि.23 :सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य व ज्या माजी सैनिक विधवांचे पाल्यांनी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी बोर्डाच्या परिक्षेमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण असतील अशा पाल्यांना एकरकमी रु. 25 हजार व रु.10 हजार रुपये देवून विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
तरी माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा यांचेकडे उपलब्ध असलेले विहित नमुन्यातील अर्ज दि. 22 सप्टेंबर 2022 पर्यंत सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,सातारा यांनी केले आहे.