महात्मा जोतिबा फुले व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आयोजित रक्तदान शिबीर आज फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह मंगळवार पेठ फलटण येथे संपन्न झाले. यावेळी 43 रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती फलटणच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदात्यांना हेल्मेट, बॅग, ब्लूटूथ, हेडफोन व इस्त्री अशा प्रकारे भेटवस्तू देत गौरवण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे सदस्य विजय येवले, मधुकर काकडे, संजय निकाळजे, मुन्ना शेख, संजय अहिवळे, सत्यवान अहिवळे, राजू मारुडा, मारुती मोहिते, प्रजन्य अहिवळे, तेजस काकडे, जय रणदिवे, उमेश कांबळे, सौ.शुभांगी खरात यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.